बुलडाण्यात दूध संकलन, वितरणाच्या वेळेत बदल Milk collection in bulldozers, Changes in delivery time
बुलडाण्यात दूध संकलन, वितरणाच्या वेळेत बदल Milk collection in bulldozers, Changes in delivery time 
मुख्य बातम्या

बुलडाण्यात दूध संकलन, वितरणाच्या वेळेत बदल

टीम अॅग्रोवन

बुलडाणा ः कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाकडून सातत्याने नवनवीन निर्बंध घातले जात आहेत. नव्या नियमावलीत दूध उत्पादकांसाठी अयोग्य वेळा दिल्याने त्या बदलण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केली.

त्यानंतर नियमात बदल करून वेळा बदलून देण्यात आल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी ७ ते ११ या वेळेतच दूध संकलन आणि वितरणास परवानगी दिल्याने दूध उत्पादक शेतकरी व दूध डेअरी संचालकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार होते. हा अन्यायकारक आदेश रद्द करावा, अशी मागणी बुधवारी (ता. २१) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली.

तुपकर यांनी तातडीने जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याशी चर्चा केली तसेच निवासी उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ही परिस्थिती अशीच राहिल्यास दूध उत्पादकांचे कंबरडे मोडेल, शिवाय रुग्ण, महिला, मुले व वृद्धांना यांनाही पोषक दुधाला मुकावे लागेल, ही बाब लक्षात आणून दिली. सायंकाळी दूध वितरणास परवानगी देण्याची मागणी रेटून धरली.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने २० एप्रिलच्या आदेशात बदल करीत जिल्ह्यातील दूध संकलन व वितरण केंद्र (दूध डेअरी) सायंकाळीदेखील ६ ते रात्री ८ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली. सकाळी ७ ते ११ या वेळेनंतर आता सायंकाळी आणखी दोन तास मुभा देण्यात आली आहे. खेरीज घरपोच दूध वाटपाकरिता सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सवलत राहणार आहे.

  वेळेत बदल करणारा पहिला जिल्हा सुधारित आदेश काढणारा बुलडाणा राज्यात पहिला ठरला आहे. दुधाबाबत आदेशात सुधारणा करण्याकरिता तुपकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी यासंदर्भात भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली.

  दूधाबाबतच्या आदेशात बुलडाण्यात पहिल्यांदाच सुधारणा राज्य शासनाने जीवनावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच परवानगी दिली आहे. त्यामध्ये दूध संकलन व वितरणाचाही समावेश होता. मात्र, तुपकर यांनी या नुकसानकारक निर्णयात बदल करण्याची मागणी रेटून धरली. अखेर प्रशासनाला शासनाच्या आदेशात सुधारणा करावी लागली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT