कोल्हापुरात हिंसक वळण
कोल्हापुरात हिंसक वळण 
मुख्य बातम्या

कोल्हापुरात हिंसक वळण

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात हिंसक वळण लागले. मंगळवारी रात्री उशिरा जयसिंगपूर व तमलगेजवळ टॅंकरला आग लावण्यात आली. तर, बुधवारी (ता.१८) सकाळी हेरवाड (ता.शिरोळ) नजीक एका एसटी बसवर दगडफेक केल्याने या मार्गावरील बसगाड्या परिवहन मंडळाने रद्द केल्या.

दरम्यान, आंदोलनाबाबत शासन गंभीर नसल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आता टॅंकर अडविण्याबरोबरच चक्का जामची घोषणा केल्याने आंदोलन तीव्र होणार आहे. दरम्यान, आंदोलकांनी पुणे-बंगळूर महामार्ग रोखणार असल्याचे जाहीर केले आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते जनावरांसह महामार्गावर येणार आहेत. महामार्गावरच ठिय्या आंदोलन होणार असल्याने परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील दूध संघाच्या संकलनात सलग तिसऱ्या दिवशी अडथळे आले. हातकणंगले, शिरोळ, कागल आदी तालुक्‍यांतील गावांनी स्वयंत्स्फूर्तीने दुधाचे संकलन न केल्याने या गोकुळसह अन्य संघांकडे गाड्या आल्या नाहीत. इतर भागांतून काही प्रमाणात दूध गोकुळकडे संकलित झाले. मात्र, एकूण संकलनाच्या चाळीस टक्केच दूध संघात आल्याचे संकलन विभागातून सांगण्यात आले.

दरम्यान, दररोज टॅंकर फोडण्यात येत असल्याने गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची तातडीची बैठक दूध संघात झाली. या वेळी दूध संकलनाचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्तात टॅंकर मुंबईकडे पाठविण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलकानी बसेसना लक्ष करण्यास सुरवात केल्याने नुकसान होऊ नये याकरिता गुरुवारी बससेवा बंद ठेवण्याबाबत हालचाली सुरू होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

SCROLL FOR NEXT