जुना मोंढा भाजीपाला मार्केटचे पाथरी रस्त्यावर स्थलांतर
जुना मोंढा भाजीपाला मार्केटचे पाथरी रस्त्यावर स्थलांतर 
मुख्य बातम्या

जुना मोंढा भाजीपाला मार्केटचे पाथरी रस्त्यावर स्थलांतर

टीम अॅग्रोवन

परभणी ः परभणी शहरातील जुना मोंढा भागातील भाजीपाला मार्केटचे स्थलांतर मंगळवार (ता. १) पासून पाथरी राष्ट्रीय महामार्गावरील कांदा, लसूण, बटाटे, फळे मार्केटमध्ये झाले आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांकडून लिलाव पद्धतीने भाजीपाला खरेदी केला जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.

परभणी शहरातील जुना मोंढा भागात महानगर पालिकेच्या मालकीच्या फळे भाजीपाला मार्केटमध्ये शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांमुळे तसेच शहरातील वाहतूक वाढल्यामुळे रहदारीसाठी अडचणीच येत होत्या. त्यामुळे गतवर्षीच्या फेब्रुवारीमध्ये जुन्या मोंढा मार्केटमधून कांदा, लसूण, बटाटे, फळे मार्केटचे स्थलांतर परभणी -पाथरी रस्त्यावरील फ्रुट अॅँड व्हिजिटेबल मर्चंटस असोसिएशनेने विकसित केलेल्या मार्केटमध्ये झाले होते. परंतु भाजीपाला मार्केट मात्र जुना मोंढा येथेच होते. दोन ठिकाणी मार्केट झाल्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांना अडचणी येऊ लागल्या.

दरम्यान, परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डावर भाजीपाल्याचे लिलाव सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे. बाजार समितीच्या मार्केट यार्डावर भाजीपाला खरेदी सुरू शेतकऱ्यांच्या सोयीचे होणार आहे, असे बाजार समितीचे सचिव विलास मस्के यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT