Member arrested along with corrupt Gram Sevak
Member arrested along with corrupt Gram Sevak 
मुख्य बातम्या

लाचखोर ग्रामसेवकासह सदस्याला अटक

टीम अॅग्रोवन

वर्धा : रमाई घरकुल योजनेचा प्रस्ताव पंचायत समितीत पाठविण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकासह झाडगाव ग्रामपंचायतीच्या सदस्याला अटक करण्यात आली. ही कारवाई झाडगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आली. .  ग्रामसेवक सचिन भास्कर वैद्य (वय ४१) आणि नरेंद्र वामन संदूरक र(वय ३८) अशी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सिंदी (मेघे) येथील रहिवासी असून, खासगी व्यवसायी आहे. तक्रारदार यांना शासनाच्या रमाई योजनेअंतर्गत घरकुल मंजुरीसाठी नवीन प्रस्ताव वर्धा पंचायत समिती कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्याकरिता ग्रामपंचायत झाडगाव (गो.) येथील ग्रामसेवक सचिन भास्कर वैद्य यांनी ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र संदुरकर यांच्या वतीने तक्रारकर्त्याला १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी तक्रारकर्त्याने लाचलुचपत विभागात तक्रार नोंदविली. पोलिस उपअधीक्षक देवराव खंडेराव यांनी प्रकरणाची पडताळणी केली. पडताळणीत सत्यता आढळून आल्याने सापळा रचून कारवाई केली असता नरेंद्र संदूरकर यांच्या राहते घरी लाच स्वीकारताना दोन्ही आरोपींना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वर्धाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी सावंगी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक डी. सी. खंडेराव, रवींद्र बावणेर, संतोष बावणकुळे, सागर भोसले, अपर्णा गिरजापुरे, कैलास वालदे, प्रदीप कुचनकर, नीलेश महाजन यांनी केली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

Crop Damage : गारपीट, वादळी पाऊस होऊनही पीक नुकसान नसल्याचा अहवाल

Veterinary : पशुचिकित्सा पुनर्रचनेविरोधात पदविकाधारकांनी थोपटले दंड

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

SCROLL FOR NEXT