‘माझी कन्या भाग्यश्री’ जाणीव जागृती रथयात्रेस प्रारंभ
‘माझी कन्या भाग्यश्री’ जाणीव जागृती रथयात्रेस प्रारंभ 
मुख्य बातम्या

‘माझी कन्या भाग्यश्री’ जाणीव जागृती रथयात्रेस प्रारंभ

टीम अॅग्रोवन

सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी कार्यक्रम सिंदखेडराजा, जि. बुलडाणा : माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या जाणीव जागृती रथयात्रेस शुक्रवारी (ता. १२) सिंदखेडराजा येथून ग्रामविकास, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रारंभ झाला, तसेच या वेळी या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थींना गौरविण्यात आले. या वेळी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, खासदार प्रतापराव जाधव, आमदार शशिकांत खेडेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष उमाताई तायड़े, जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांची प्रमुख उपस्थिती होती. महिला व बालविकास विभागामार्फत ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी, तसेच मुलगी माझा वारसदार ही संकल्पना समाजात रुजविण्याकरिता ही योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेनुसार ७.५० लक्ष वार्षिक उत्पन्न असणाऱ्या समाजातील सर्व घटकांतील कुटुंबांमध्ये जन्माला येणाऱ्या पहिल्या दोन मुलींसाठी ही योजना लागू आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोचविण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत राजमाता जिजाऊ यांचा जन्म दिवस माझी कन्या भागयश्री जाणीव जागृती अभियान म्हणून साजरा करण्यात येत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT