yarn
yarn  
मुख्य बातम्या

टेक्‍सटाईल पार्कसाठी ‘पणन’चा पुढाकार

Vinod Ingole

नागपूर ः केंद्रीय अर्थसंकल्पात सात नव्या टेक्‍सटाईल पार्कची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केली होती. यातील एक पार्क विदर्भाला मिळावा आणि त्या माध्यमातून या भागात कापसावरील प्रक्रियेला चालना मिळत त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी व्हावी याकरिता महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी लवकरच संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चेचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. 

देशातील दहा राज्यांत कापूस लागवड होते. परंतु गेल्या काही वर्षांत बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने कापसाची उत्पादकता सातत्याने कमी होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कापसाचे प्रक्रिया उद्योग उभारणी झाल्यास कमी उत्पादकतेच्या काळात अधिक दराच्या माध्यमातून काही प्रमाणात तूट भरुन काढणे शक्‍य होणार आहे. केंद्र सरकारने नुकतीच देशात सात नव्या टेक्‍सटाईल पार्क उभारणीची घोषणा केली. त्यातील एक पार्क खानदेशमध्ये उभारण्यात यावा, अशा आशयाचे मागणीवजा विनंती पत्र खासदार उन्मेष पाटील यांनी केंद्र सरकारला पाठविले आहे. 

विदर्भातून मात्र अशाप्रकारची मागणी झाली नसली तरी आता थेट पणन महासंघाकडूनच टेक्‍सटाईल पार्कच्या उभारणीसंदर्भाने हालचाली होत असल्याने कापूस उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.  प्रतिक्रिया केंद्र सरकारने सात टेक्‍सटाईल पार्कची घोषणा केल्यानंतर त्यातील एक विदर्भात उभारले जाईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. राज्यात 42 लाख हेक्‍टरवर कापूस होतो. त्यातील 16 लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र विदर्भात आहे. त्यामुळे टेक्‍सटाईल पार्कची उभारणी झाल्यास कापूस उत्पादकांचे व्यापक हित त्यातून साधले जाणार आहे. त्याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत. पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांसमोर हा विषय मांडत त्यानंतर संचालक मंडळांच्या बैठकीत यावर चर्चा करुन पुढील रणनीती ठरविली जाईल. - अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ  ‘सीसीआय’करीता एजंट म्हणून पणन महासंघाकडून कापूस खरेदी होते. त्यामुळे या यंत्रणेचा कापसातील अनुभव पाहता त्यांनीच टेक्‍सटाईल पार्ककरीता पुढाकार घेतल्यास निश्चितच व्यापक शेतकरी हित साधले जाईल.  - गोविंद वैराळे, ज्येष्ठ कापूस अभ्यासक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

SCROLL FOR NEXT