मराठवाड्यात चाराटंचाईने पशुधनाची अाबाळ
मराठवाड्यात चाराटंचाईने पशुधनाची अाबाळ 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात चाराटंचाईने पशुधनाची अाबाळ

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : पावसाने मारलेल्या दडीने केवळ पीकच नाही तर मुक्‍या जनावरांचीही अोंबाळ सुरू आहे. अर्धपोटी राहून जनावरं जगविण्याची पाळी मालकांवर आली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील खुल्ताबाद, सिल्लोड, गंगापूर, कन्नड, वैजापूर तसेच जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद भोकरदन, बीड जिल्ह्यातील आष्टी, धारूर, शिरूर कासार, परळी, वडवणी, लातूर जिल्ह्यातील जळकोट, नांदेड जिल्ह्यातील देगलूर, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्‍यात पावसाची स्थिती बिकट आहे. जालना जिल्ह्यात पशुधनाच्या तुलनेत ८२ दिवस पुरेल एवढाच चारा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. 

औरंगाबाद जिल्ह्यात त्यावेळी साडेतीनशे दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले होते. हिंगोली जिल्ह्यात १२२ दिवस, बीड जिल्ह्यात १३० दिवस, परभणी जिल्ह्यात ११४ दिवस, नांदेड जिल्ह्यात २०८ दिवस, उस्मानाबाद जिल्ह्यात २९४ दिवस तर लातूर जिल्ह्यात २६८ दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले होते. चारा उगवला नसल्याने जायकवाडी कॅनॉल पट्‌टा नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर भागातून ऊस २५०० ते ३००० रुपये प्रतिटनाने विकत घेण्याची वेळ आली आहे.

माझ्याकडे पाच जनावरे, काही साठवलेला चारा व काही ऊस असं सध्या जनावरांना खाऊ घालणं सुरू आहे. दहा दिवसाला एक टन ऊस चारा म्हणून विकत घेतो. त्याला कधी तीन हजार, तर कधी पस्तीसशे रुपये मोजावे लागतात. - नारायण पिवळ, शेतकरी, आडूळ, ता. पैठण

आमच्याकडं पंधरा जनावरं, एक टन चारा सहा सात दिवस कसाबसा पुरवतोय. एका जनावराला एक पाटी (५ ते ६ किलो) उसाची कुट्‌टी सकाळी व संध्याकाळी, जोडीला थोडाबहुत इतर वाळलेला चारा असतो. पण चाऱ्याअभावी जनावरं जगविण्यासाठी कसरत सुरू आहे. - गोकूळ बनकर, शेतकरी लाखगंगा, ता. वैजापूर. 

चार जनावरांसाठी एक टन उसाचा चारा दहा दिवस पुरवितो, चारा मिळतोच कुठं. श्रीारामपूर भागातून येणारा ऊसही किती दिवस पुरलं हे सांगता येत नाही. आजच एका शेतकरी मित्राकडून एक उसाची मोळी उसनी घेतली. पावसानं सारा घोर केला.  - राजेंद्र तुरकने, शेतकरी, लाखगंगा, ता. वैजापूर.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT