मराठवाड्यात पावसाची रिपरिप; पिकांना जीवनदान
मराठवाड्यात पावसाची रिपरिप; पिकांना जीवनदान 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात पावसाची रिपरिप; पिकांना जीवनदान

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील कपाशी पिकासह तूर, मूग, बाजरी पिकाला मोठा फटका बसला. मात्र मराठवाड्यातील सोयगाव, कन्नड, गंगापूर तालुका, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, लातुर आदी ठिकाणी बुधवारी रात्रीपासून रिपरिप पावसाची सुरवात झाली. सिल्लोड आणि खुलताबाद, भोकरदन (जि. जालना) तालुक्यात हलका पाऊस झाला. तसेच गुरुवारी सकाळी यात वाढ झाल्याने मराठवाड्यातील कपाशीला पावसाचा चांगलाच आधार झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २० दिवसांच्या खंडानंतर पावसाला सुरवात झाली. शहरातही सकाळीच पावसाला सुरुवात झाल्याने शाळकरी मुलांसह कामावर जाणाऱ्यांची एकच धावपळ उडाली.

सेलू, मंठ्यात भिज पाऊस परभणी जिल्ह्यातील सेलू, आणि मंठा, परतूर (जि. जालना या ठिकाणी बुधवारी रात्रीपासून भिज पावसाला सुरवात झाली. रात्रभर सुरू असलेल्या या पावसाने पिकांना आधार मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

उत्तर भारतात केंद्रित असलेला मान्सून महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगणावर केंद्रित होत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि मराठवाड्यासाठी हा पहिला दमदार पाऊस असणार आहे.  - उदय देवळाणकर, कृषी अभ्यासक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT