खानदेशात अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद
खानदेशात अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद 
मुख्य बातम्या

खानदेशात अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद

ॲग्रोवन वृत्तसेवा 

जळगाव ः खानदेशात धुळे, जळगाव व नंदुरबारमधील अनेक बाजार समित्या, उपबाजारांमध्ये भाजीपाल्याचे लिलाव बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांदा दरात सतत घसरण सुरू असून, शेतकऱ्यांचा खर्चही निघणार नाही, अशी स्थिती आहे.  धुळ्यात लॉकडाउन संबंधीचे काही निर्बंध १५ एप्रिलपर्यंत लागू केले आहेत. प्रशासनाने बाजार समित्यांना लिलाव प्रक्रियेदरम्यान होणारी गर्दी आवरा, असे वारंवार बजावले होते. धुळ्यात कोरोनाचा कहर झाल्याने भाजीपाला लिलाव प्रक्रिया धुळे येथील बाजार समितीत बंद अवस्थेत आहे. पिंपळनेर (ता. साक्री) व शिरपूर येथे लिलाव सुरू आहेत.  नंदुरबारातही लॉकडाउन सुरू आहे. तेथेही भाजीपाला लिलाव प्रक्रियेत अडतदार सहभागी होत नसल्याने लिलाव प्रक्रियेला फटका बसला आहे. सध्या भाजीपाला लिलाव बंद अवस्थेत आहेत. जळगावमधील जळगाव, चोपडा कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. यामुळे या दोन्ही बाजार समित्यांमधील भाजीपाला लिलाव बंद अवस्थेत आहेत. चोपड्यातील आठवडी बाजार रविवारी भरतो. हा बाजारही बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. विशेषतः कांदा उत्पादकांचे अधिक नुकसान होत आहे. कांद्याची काढणी सुरू झाली आहे. पण शेतकरी कांदा विक्री करू शकत नाही. आठवडी बाजारही बंद असल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.  गावोगावी जाऊन कांद्याची विक्री कांद्याचे दर ५०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल, असे झाले आहेत. मार्चच्या मध्यात कांद्याचे दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. पण त्यात क्विंटलमागे किमान २०० रुपयांची घसरण झाली आहे. काही शेतकऱ्यांनी गावोगावी जाऊन कांद्याची विक्री सुरू केली आहे. प्रतिगोणी (४० किलोची एक गोणी) २५० ते ३०० रुपये दर मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका

Weather Update : विदर्भात गारपीट, वादळी पावसाचा इशारा

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

SCROLL FOR NEXT