hapus
hapus 
मुख्य बातम्या

मुंबई बाजार समितीत आंब्याची आवक वाढली; दरातही सुधारणा

टीम अॅग्रोवन

मुंबई: टाळेबंदीमुळे दररोज आंब्याच्या केवळ शंभर गाड्या घाऊक फळ बाजारात आणण्याची परवानगी बाजार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली आहे, मात्र आंब्याची मागणी आणि आवक मोठी असल्याने बाजाराबाहेर आंब्याच्या थेट गाड्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. तसेच व्यापाऱ्यांच्या गोदामांतही आंब्याची रवानगी केली जात आहे. त्यामुळे आंब्याची आवक वाढली आहे, तर दरात मागच्या आठवड्याच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे.  घाऊक बाजारात गर्दी टाळण्यासाठी गाड्यांच्या आवकीवर मर्यादा आली आहे. त्यातल्या त्यात आंब्याच्या सर्वाधिक गाड्या बाजारात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दररोज शंभर गाड्या येत आहेत, मात्र हा मुख्य हंगाम असल्याने बाजारात सरासरी २५० ते ३०० गाड्या हापूसची आवक बाजारात होत असते. लॉकडाऊनमुळे इतके दिवस आंबा बाजारात पोहोचू शकत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्याचबरोबर आंबा खव्वयांची पण निराशा झाली. आता आंबा बाजारात पोहोचू लागल्यापासून हापूसला मागणी वाढली आहे. त्यापाठोपाठ दरही वाढले आहेत. मागच्या आठवड्यापर्यंत उत्तम दर्जाचा हापूस आंबा २०० ते ३०० रुपये डझनपर्यंत होता. आता तो ५०० ते ६०० रुपये डझनपर्यंत आला आहे, अशी माहिती व्यापारी विजय बेंडे यांनी दिली. मागणीत वाढ झाल्याने हे दर वाढले आहेत, असे व्यापारी सांगत आहेत.  तोंडावर अक्षय तृतीया असल्याने आंब्याच्या मागणीत वाढ होत आहे. बाजारात आलेला आंबा पिकायला तीन दिवस जातात. त्यानुसार आता बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. बाजारात आंब्याच्या गाड्यांच्या आवकीवर मर्यादा असल्याने थेट काही व्यापाऱ्यांच्या गोदामात आंब्याच्या गाड्या रिकामी होत आहेत. त्यामुळे बाजारात आंबा मुबलक प्रमाणात आहे. कमतरता भासणार नाही, असेही व्यापारी सांगत आहेत.  वाशीतील घाऊक बाजार समितीमधील पाचही बाजारांमध्ये खरेदीसाठी नेहमीच गर्दी असते. मात्र, सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून सर्वच बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी बाजारात काटेकोरपणे नियमांचे पालन केले जाते. त्यामुळे बाजारातील गर्दी कमी झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजार सुरू ठेवले आहेत. मात्र, मागच्या काही दिवसांपासून बाजारातील गर्दी अपेक्षेपेक्षा कमी झाल्याचे चित्र आहे.  अन्नधान्य बाजार, मसाला बाजाराबरोबर सर्वांत जास्त गर्दी असलेल्या भाजीपाला बाजाराबरोबर फळ आणि कांदा, बटाटा बाजारातही ग्राहकांची संख्या रोडावली आहे. अनेक व्यापारी भीतीपोटी अजूनही बाजारात व्यापार करायला येत नसल्याची परिस्थिती बाजारात आहे. परिणामी येथील वाहनाची वर्दळही कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात आता शुकशुकाट आहे.  बाजारात शुकशुकाट  नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून बाजार समितीने आणि सरकारनेही पुढाकार घेऊन घाऊक बाजार समित्या सुरू ठेवल्या आहेत. त्यानुसार आता नवी मुंबईतील पाचही घाऊक बाजार सुरळीत सुरु आहेत. मात्र, बाजारातील गर्दी ओसरली आहे. त्यामुळे सर्वच बाजारांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. बाजारातील दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम होऊ लागला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT