माणदेशी उद्योजिकांची कामगिरी जागतिक स्तरावरची ः डॉ. नीलम गोऱ्हे
माणदेशी उद्योजिकांची कामगिरी जागतिक स्तरावरची ः डॉ. नीलम गोऱ्हे 
मुख्य बातम्या

माणदेशी उद्योजिकांची कामगिरी जागतिक स्तरावरची ः डॉ. नीलम गोऱ्हे

टीम ॲग्रोवन

मुंबई: महिलेची आर्थिक परिस्थिती बदलली, की मानसन्मान मिळतो, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा. त्यासाठी माणदेशी भगिनींसाठी मुंबईतील बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच माणदेशी उद्योजिकांची कामगिरी जागतिक स्तरावरची असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. 

माणदेशी महोत्सवाचे उद्‍घाटन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ९) झाले. या वेळी माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, डाऊचे सीईओ सुधीर शेणॉय, एचएसबीसीचे सीईओ रोशा, माणदेशी महिला बँकेच्या सीईओ रेखा कुलकर्णी आदी उपस्थित होते. अस्सल ग्रामीण संस्कृतीचा मुंबईकरांना अनुभव देणाऱ्या माणदेशी महोत्सवाचे मुंबईतील हे चौथे वर्ष आहे. यंदा ९ जानेवारी ते १२ जानेवारी २०२० दरम्यान ‘माणदेशी महोत्सव’ रवींद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात रंगणार आहे. 

या वेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माणदेशी महोत्सवाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, की महिलेची आर्थिक परिस्थिती बदलली की मानसन्मान मिळतो, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा. माणदेशी भगिनींसाठी मुंबईतील बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासोबतच आठवडी बाजारासाठी प्रयत्न करा. येत्या काळात महिला आर्थिक विकास महामंडळ, वित्तीय संस्था आणि इतर संस्था यांना सोबत घेऊन शासकीय उद्योग धोरणांमध्ये या उद्योजिकांना जमीन मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला सरपंच असलेल्या गावात महिला वाचनालयासाठी ५१ हजार रुपयांची देणगी आमदार निधीतून देणार असल्याचे त्यांनी या वेळी घोषित केले. या वेळी माणदेशी भगिनींना विधानभवनास भेट देण्याचे त्यांनी निमंत्रण दिले. 

चेतना सिन्हा म्हणाल्या, की दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आमचे शेतकरी दूध, ताक विकतात; पण त्यांना लोणी मिळत नाही. शेतकरी जर श्रीमंत असेल तर देश श्रीमंत होईल. माणदेशी उद्योजिकांसाठी बाजारपेठ, भांडवल आणि तंत्रज्ञान आवश्यक आहे. माणदेशी महिला शिकल्या नसतील; पण उद्योगात त्या कुठेच कमी पडत नाहीत. माणदेशी महिला उद्योजिका ई-कॉमर्सवर आहेत हे ई-कॉमर्स कंपनीचे भाग्य, कारण कष्टकरी महिला येथे आल्या आहेत. पहिले बिझनेस स्कूल या महिलांनी सुरू केले. मुंबईकरांनी या महोत्सवात येऊन आनंद घ्यावा, असे आवाहनही सिन्हा यांनी केले. 

या महोत्सवात प्रसिद्ध भारूडकार चंदा तिवाडी आपली कला सादर करणार आहेत. ख्यातनाम गायिका मृदुला दाढे-जोशी आणि गावरान गोडवा असलेल्या आरजे केराबाई यांची जुगलबंदी, माणदेशी कम्युनिटी रेडिओच्या ग्रामीण कलाकारांचे सादरीकरण, माणदेशी चॅम्पियन महिला कुस्ती, त्याचबरोबर लोकनृत्याचा प्रकार असलेले ‘गझी नृत्य’ पाहण्यास मिळणार आहे. माणदेशी महोत्सवाला १२ जानेवारीपर्यंत सकाळी १०.३० ते ८.३० या वेळेत कधीही भेट देता येणार आहे. हा महोत्सव सर्वांसाठी मोफत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT