संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूट

गणेश कोरे

पुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी मंचर (ता. आंबेगाव) कृषी उत्पन्न बाजार समितीत कटतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. सध्या पालेभाज्यांचे दर वधारलेले असताना शेतकऱ्यांच्या हाेणाऱ्या लुटीकडे बाजार समिती प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे समाेर येत आहे. शेकड्याला १० जुड्यांची कटती हाेत असल्याने शेतकऱ्यांना लाखाे रुपयांच्या नुकसानीला सामाेरे जावे लागत आहे. याबाबात दत्तात्रय खंडेराव चव्हाण (रा. अवसरी बुद्रुक) यांनी बाजार समितीकडे तक्रार केली आहे. चव्हाण म्हणाले, ‘‘मी बाजार समितीमध्ये दाेन वेळा एक-एक हजार जुड्या विक्रीसाठी नेल्या हाेत्या. व्यापाऱ्यांनी साैदा झाल्यावर शंभराला १० जुड्या हिशाेबाला कमी धरल्या.

याबाबत मी व्यापाऱ्याला हिशाेबपट्टीवर सर्व व्यवहार घ्यायला लावला, पण त्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे मला शेकड्याला २६०० रुपये दर मिळाला हाेता. दाेन हजार जुड्यांमागे २०० जुड्यांची कटती केल्याने मला सुमारे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत मी बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली. याबाबत सचिवांनी मला हिशाेबपट्टीसह चाैकशीसाठी बाेलावले असून, कटती बंद करण्याचे आश्‍वासन दिले.

याबाबत बाजार समितीचे सचिव गावडे म्हणाले, ‘‘बाजार समितीमध्ये काेणत्याही प्रकारचा कडता घेतला जात नाही. तसेच शेतकऱ्यांच्या काेणत्याही लेखी तक्रारी आलेल्या नाहीत. शेतकरी आणि व्यापारी परस्पर संमतीने घेत असल्यास माहिती नाही.

मात्र, कडत्याबाबत तक्रारी आल्यातर आम्ही त्या जागेवरच साेडवताे. सध्या बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १५) मेथीच्या सुमारे १२ हजार जुड्यांची आवक हाेऊन ६०१ ते १७५० रुपये शेकड्याला दर मिळाला आहे. तर काेथिंबीरीची ९ हजार ३२१ आवक हाेऊन, ४०१ ते ३ हजार ४०१ रुपये दर मिळाला आहे’’.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT