गडचिरोली ः बोरी शिवारात चिकट सापळ्यांविषयी माहिती देताना डॉ. बोथीकर व तज्ज्ञ
गडचिरोली ः बोरी शिवारात चिकट सापळ्यांविषयी माहिती देताना डॉ. बोथीकर व तज्ज्ञ 
मुख्य बातम्या

‘कामगंध सापळ्यांद्वारे खोडकिड्याचे व्यवस्थापन करावे`

टीम अॅग्रोवन

गडचिरोली : कामगंध सापळ्यांचा वापर करून धान पिकावर येणाऱ्या खोडकिडा आणि तुडतुड्याचे व्यवस्थापन शेतकऱ्यांनी करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ डॉ. पुष्पक बोथीकर यांनी केले.

कृषी विभाग गडचिरोलीतर्फे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या धानावरील खोडकिडा निर्मूलन सप्ताहात धानोरा तालुक्‍यातील बोरी येथे आयोजित प्रशिक्षणात बोथीकर बोलत होते. उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरडकर, तालुका कृषी अधिकारी बडवाईक, मंडळ कृषी अधिकारी एन. एस. पाठक, बी. आर. पानसे, जयदेव बेहरे या वेळी उपस्थित होते.

धान पिकाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन, खोडकिडा निर्मूलनासाठी कामगंध सापळ्यांचा वापर, याविषयी बोथीकर यांनी मार्गदर्शन केले. चिकट सापळा वापराविषयीचे प्रात्यक्षिके शेतकऱ्याच्या शेतावर या वेळी करण्यात आली. प्रीती हिरडकर यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती या वेळी दिली. धान पिकावर येणारे विविध कीडरोग व त्याचे नियंत्रण याविषयीची माहिती शेतकऱ्यांनी जाणून घेतली.

 
 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT