लष्करी अळीच्या भीतीने मका लागवडी लांबल्या
लष्करी अळीच्या भीतीने मका लागवडी लांबल्या 
मुख्य बातम्या

लष्करी अळीच्या भीतीने मका लागवडी लांबल्या

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात हरभऱ्यानंतर महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या मका पिकाच्या लागवडीसंबंधी अजूनही फारशा हालचाली दिसत नसल्याचे चित्र आहे. खरिपात मक्‍यावर अमेरिकन लष्करी अळीने धुमाकूळ घातला होता. आता रब्बीतही मका पिकाला ही अळी फस्त करील, या भीतीने शेतकरी मका लागवडीसंबंधी धजावत नसल्याचे चित्र आहे. 

रब्बी हंगामाचे नियोजन करताना मका पिकासंबंधी कृषी विभागाने बियाणे, लागवडीनंतरची जनजागृती यासंबंधी आराखडा बांधला आहे. मका पीक महत्त्वाचे आहे. त्यातून धान्य व चारा उपलब्ध होतो. मक्‍याचे दर मागील दोन वर्षे टिकून असून, किमान १७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर जागेवरच शेतकऱ्यांना मिळाला आहे. यंदा मक्‍याचे खरिपात लष्करी अळी व नंतर अतिवृष्टीत नुकसान झाल्याने बाजारात मक्‍याची अपवादानेदेखील आवक सुरू नाही. 

जळगाव जिल्ह्यात सुमारे सव्वादोन ते अडीच लाख हेक्‍टरवर रब्बी हंगाम असणार आहे. यात किमान ६० ते ७० हजार हेक्‍टरवर मक्‍याची लागवड अपेक्षित मानली जाते. परंतु, लष्करी अळीचे संकट कायम आहे. मराठवाड्यात काही शेतकऱ्यांना महिनाभरापूर्वी पेरलेल ज्वारी पिकात लष्करी अळी आल्याने पीक मोडावे लागल्याची माहिती शेतकऱ्यांमध्ये समाजमाध्यमातून फिरत आहे. यामुळे आपल्याकडेदेखील मका, ज्वारीवर लष्करी अळी येईल, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. 

परिणामी, मक्‍याची लागवड सुरू झालेली दिसत नाही. अनेक शेतकरी नोव्हेंबरच्या मध्यात मका लागवड करतात. तर काही शेतकरी कापसाखालील क्षेत्र रिकामे करून डिसेंबरअखेरिस मका लागवड करतात. नोव्हेंबरमध्ये कडधान्य, सोयाबीन, ज्वारी आदी पिकांखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात मका लागवडीचा प्रघात आहे. यंदा पाऊसमान चांगले राहिल्याने गिरणा, तापी, वाघूर नदीच्या क्षेत्रात जळगाव जिल्ह्यात मका लागवड बऱ्यापैकी होईल, अशी अपेक्षा आहे.

शेतकरी संभ्रमात धुळ्यात शिरपुरात तर नंदुरबारमध्ये शहादा, नवापूर भागात मका लागवड होत असते. अनेक शेतकरी उत्तम व्यवस्थापन करून एकरी २५ ते ३० क्विंटल मका उत्पादन साध्य करतात. परंतु, लष्करी अळीसंबंधी उपाययोजना होत नाहीत. कुठली कीडनाशके, प्रतिबंधात्मक उपाय करावेत, याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत. शिवाय खर्च वाढत आहे. यामुळे शेतकरी तूर्ततरी मका लागवड टाळत असल्याचे सांगितले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT