शाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील ः अरुण बरोका
शाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील ः अरुण बरोका 
मुख्य बातम्या

शाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम आरोग्‍य राहील ः अरुण बरोका

टीम अॅग्रोवन

नांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्‍कृष्‍ट ठरले आहे. गावाला शाश्‍वत स्‍वच्‍छतेत टिकून ठेवण्‍यासाठी शौचालयाच्या वापरासह परिसर स्‍वच्‍छ ठेवल्‍यास ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्‍यमान उंचावेल, असे प्रतिपादन भारत सरकारच्‍या पेयजल व स्‍वच्‍छता मंत्रालयाच्‍या स्‍वच्‍छ भारत मिशन(ग्रामीण)चे संयुक्‍त सचिव अरुण बरोका यांनी केले.

राष्‍ट्रीय वार्षिक स्‍वच्‍छता सर्वेक्षणासाठी मंगळवारी (ता. १५) श्री. बरोका नांदेड जिल्‍हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी कंधार तालुक्‍यातील उस्‍माननगर व मंगल सांगवी या गावांना भेट देऊन गावांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. त्‍या वेळी ते बोलत होते. 

या वेळी जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पेयजल व स्‍वच्‍छता मंत्रालयाचे तज्ज्ञ अविनाश स्‍वरूप, औरंगाबाद विभागीय आयुक्‍त कार्यालयाचे विकास विभागाचे सहायक आयुक्‍त अनंत कुंभार, पाणी व स्‍वच्‍छता सहाय्य संस्‍थेचे विभागीय सल्‍लागार अरुण रसाळ, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी जी. एल. रामोड, कार्यकारी अभियंता मिलिंद गायकवाड, विस्‍तार अधिकारी उल्‍हास खळेगावकर, कंतार पब्लिक संस्‍थेचे सल्‍लागार कलिम अहमद आदींची उपस्थिती होती.

बरोका म्‍हणाले, ‘‘नांदेड जिल्ह्यातही पायाभूत सर्वेक्षणानुसार चांगली कामे झाली आहेत.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT