महाबीज देणार ६६ हजार कामगंध सापळे
नागपूर : व्यवसायिक सामाजिक बांधीलकीअंतर्गत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळातर्फे गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी मोफत फेरोमोन सापळे वितरणाची सुरवात करण्यात आली. याअंतर्गत सुमारे ६६ हजार कामगंध सापळे मोफत देण्यात येणार आहेत.
महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार ॲड. संजय धोत्रे यांची या वेळी उपस्थिती होती.
या वर्षी गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी व्यापक उपाययोजनांवर शासन स्तरावरून भर देण्यात आला आहे. गुलाबी बोंड अळीची नुकसान पातळी कळावी, यासाठी या अळीचे पतंग आकर्षित होण्याच्या उद्देशाने कामगंध सापळे शेतात लावण्याला प्रोत्साहन देण्यात येत आहे. हे वाटप होत आहे. महाबीजचे महाव्यवस्थापक (विपणन) रामचंद्र नाके, महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन) संजय ठकरार, महाव्यवस्थापक (गुण नियंत्रण) प्रफुल्ल लहाने, कंपनी सचिव विनय वर्मा यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.