मुख्य बातम्या

महापूरग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

टीम अॅग्रोवन

सांगली ः जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी महापूर आला. या महापुराने शेतीचे १३० कोटी ६३ लाख रुपयांचे नुकसान झाले. कृषी विभागाने त्याचे पंचनामेदेखील केले. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम अद्यापही वर्ग झालेली नाही. त्यामुळे ही रक्कम कधी वर्ग होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावांमध्ये महापूर आला. या महापुरात पाच तालुक्यांतील शेती आणि पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर कृषी विभागाने तातडीने पंचनामे सुरू केले. हे पंचनामे सप्टेंबर महिन्यात पूर्ण झाले. त्यामध्ये नजर अंदाजे ६६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल तयार केला. त्यानंतर शासनाने महापुरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार, अशी घोषणा केली. त्यामुळे कृषी विभागाकडून बिगर कर्जदार शेतकऱ्यांची यादी करण्यास सुरुवात केली. सध्याच्या अहवालानुसार ९२ हजार ४४१ शेतकऱ्यांना महापुराचा फटका बसला आहे. वास्तविक पाहता हे शेतकरी बिगर कर्जदार  आहेत.  वास्तविक पाहता ही यादी लवकर करणे अपेक्षित होते. जिल्हा बॅंक, खासगी बॅंक आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयांमार्फत ही यादी करणे सोपे होते. परंतु, कृषी विभागाकडून ही यादी तयार करण्यासाठी लवकर हालचाली केल्या नाहीत. अर्थात ही यादी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तयार झाली. पाच तालुक्यांतील ९२ हजार ४४१ शेतकऱ्यांचे १३० कोटी ६३ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल सादर जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला आहे. कृषी विभागाने नुकसानभरपाईची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे.  पूरबाधित गावात शेती वगळता इतर भरपाई मिळाली आहे, मग शेतीची भरपाई का मिळाली नाही, त्यामुळे ही भरपाई लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT