संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

माफसूचे कुलगुरू आज ठरणार

टीम अॅग्रोवन

नागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीला मुहूर्त मिळाला असून मंगळवारी (ता.२६) नव्या कुलगुरूची घोषणा राज्यपाल कार्यालयाकडून होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संशोधनात्मक उपलब्धीऐवजी अनेक घोटाळे नावे असलेल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०१७ मध्ये संपुष्टात आला होता. तेव्हापासून प्रभारी कुलगुरू म्हणून नागपूर विभागीय आयुक्‍त अनुपकुमार काम पाहात होते. नव्या कुलगुरूच्या निवडीसाठी वारंवार निवड समितीकडून तारीख पे तारीख देण्यात आली. निवड समितीकडून असा वेळकाढूपणा होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एेनवेळी काही जणांची नावे यादीत घुसविण्याकरिता हा प्रकार चालविल्याची चर्चाही रंगली होती.

यातील एक होईल कुलगुरू बिकानेर (राजस्थानी) येथील राष्ट्रीय उंट संशोधन संस्थेचे संचालक एन. ए. पाटील (अकोला), माफसूचे विद्यमान कार्यकारी परिषद सदस्य व नागपूरचे रहिवासी व्ही. व्ही. कुळकर्णी, डॉ. आशिष पातूरकर (मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता), हैदराबाद येथील कुक्‍कुटशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. रेड्डी, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. जयप्रकाश या पाच जणांच्या नावांची शिफारस निवड समितीने राज्यपालांकडे केली आहे. मंगळवारी (ता.२६) राज्यपाल या पाच जणांच्या मुलाखती घेत कुलगुरूचे नाव जाहीर करतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

SCROLL FOR NEXT