...व्हय १५ दिवसांची नोकरी हाय...!
...व्हय १५ दिवसांची नोकरी हाय...! 
मुख्य बातम्या

...व्हय १५ दिवसांची नोकरी हाय...!

Raj Chougule

एरव्ही सूर्य डोईवर यी पर्यन्त सताड पडलेला गण्या. आज एरवाळीच उठला... गण्या एवढ्या का लवकर उठलास, कुठं चाललास असं विचारत माय ने एक कप चा त्याच्या तोंडासमोर धरला. गण्या आपल्याच नादात आरशाचा एक कोपरा धरून भांग पाडीत उभा होता.. आये इलेकशन आल्याती आमच्या सायेबान तालुक्याला बोलीवलंय.. लै महत्त्वाचं काम है म्हन.. हे बघ सकाळपासून दोन फोन आल्यात असं म्हणत एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात एक कप धरून तो आय ला दाखवू लागला. मला एक मोठी जबाबदारी देणार हाय सायेब ..मी जातो ग असं म्हणत बुटाची नाडी बांधत गण्या पळालादेखील.  तसा गण्या पदवीधर. गावात वरसानवर्स दुसकाळ. गण्याला ४ एकर जिमीन पण सगळी कोरडी ठाक्क. गण्याला हाफीसर व्हायचं हुत पन वशिला नव्हता.. कालीज झाल्यावर कामधंदा नसल्याने तो घरीच राहू लागला. आयच्या जिवाला घोर लागाय लागला. गावच्या ओळखीतल्या माणसाला गाठून तालुक्याला एका पुढाऱ्या कड गण्याला घेऊन जाऊन आली. पुढाऱ्याने वरसभर नोकरी देतो म्हणून संगीतले पण द्यायचं काय नाव घेईना. मधी मधी पुढारी त्याला बोलवायचा कामे करून घ्यायचा अन पाच पन्नास रुपडं टेकवून घरी पाठवायचा.. पण नोकरीच नाव काढायचा नाही..अनेक दिसापासून गायब असलेल्या त्या पुढाऱ्यानं आज गण्याची आठवण काढली हुती... सांजकाळी माय आतुरतेने गण्याची वाट पाहत हुती. हातात झेंडे बिल्याची पिशवी घेऊन गण्या दबकतच घरी आला. मायला वाटल नोकरी नसली तरी पुढाऱ्याने गण्याला नवीन धंदा सुरू करून दिला वाटतं.. ती माय झपकन आणि उत्साहान ईचारले, सायेबान नोकरी लावली की धंदा सुरू करून दिला?.. तसा गण्या बोलला व्हय आय १५ दिवसांची नोकरी हाय, हे झेंडं घ्यायचं आणि गावागावात फिरून सायेबाचा परचार भी करायचा.. हे ऐकून मायेचा फुललेला चेहरा कोमजला. झेंडा फडकवत रानोमाळी फिरणाऱ्या गण्याचा चेहरा तिला दिसू लागला. केवळ राजकीय स्वार्थासाठी गण्याचा उपयोग करून घेणाऱ्या त्या पुढाऱ्याचा भयंकर राग आला.. या ईचारात चुलीला लावलेली भाकरी कधी काळी ठिक्कर पडली हे बी तिच्या ध्यानात आलं नाही...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT