पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी 
मुख्य बातम्या

शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील मध्यस्थांविरुद्ध  माझा लढा : पंतप्रधान मोदी

टीम अॅग्रोवन

नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. महागाई वाढताच काँग्रेस गोंधळ घालून गृहिणी व शेतकऱ्यांची दिशाभूल करतात. परिस्थिती संतुलित ठेवण्यासाठी माझा लढा शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील मध्यस्थांविरुद्ध आहे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली.

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी (ता. २२) पिंपळगाव बसवंत येथे प्रचारसभा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश महाजन, नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉ. भारती पवार, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, हरिश्चंद्र चव्हाण, ज्‍येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील, आमदार बाळासाहेब सानप, अनिल कदम, राहुल आहेर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे आदी या वेळी उपस्थित होते.

श्री. मोदी म्हणाले, की नाशिकला लवकरच ड्रायपोर्ट सुविधा उपलब्ध करून देणार आहे. शेतकरी सन्मान योजनेचा निर्णय ऐतिहासिक आहे. या योजनेची व्याप्ती वाढविणार असून ५ एकरांची अट रद्द करण्यात येईल. शेतकऱ्यांना बँक खात्यात रक्कम येऊ लागली आहे. सगळ्या शेतकऱ्यांना रक्कम मिळणार हे निश्चित  आहे. भारताकडे वक्रदृष्टी करण्याअगोदर शत्रू शंभर वेळा विचार करतो. समोरच्याशी डोळ्यात डोळे घालून बोलणार हे मागील निवडणुकीत बोललो होतो. त्याचा प्रत्यय या पाच वर्षांत आला असेल. भारत देशाचा जगात जयजयकार झाला. हे केवळ जनतेच्या मतदानामुळे शक्य झाले. देशाची सुरक्षा, भ्रष्टाचार, विकास या विषयांवर काम करत आहे. मात्र, काहींना याचा शॉक लागतो आणि यातून माझ्यावर टीका केली जाते, असे श्री. मोदी म्हणाले.

श्री. फडणवीस म्हणाले, की, राष्ट्रवादीचे बहुरूपी शौर्य दाखवून नाही तर भ्रष्टाचार केल्यामुळे जेलमध्ये गेले. शरद पवार सध्या सद्‌सद्‌विवेकबुद्धी जागेवर नसल्यासारखी विधाने करत असून मोदींनी गुगली टाकल्याने ते पॅव्हेलीयन मध्ये परतले आहेत.

सभा सुरू असताना उपस्थितांनी फिरवली पाठ  या प्रचार सभेत रामदास आठवले, अनिल कदम,  राहुल आहेर,  देवयानी फरांदे, हेमंत गोडसे  आणि  डॉ. भारती पवार यांची भाषणे झाली. मात्र त्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू असताना काही मिनिटांतच अनेक जणांनी सभेकडे पाठ फिरवली व मंडपाबाहेर अनेक उपस्थितांचे घोळके बाहेर पडल्याचे दिसून आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

Agriculture Drone : ‘वनामकृवि’मध्ये कृषी ड्रोन तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम

Cotton Cultivation : आठ राज्यांत अतिसघन कापूस लागवड प्रकल्प

Cotton Market : परभणी, हिंगोलीत कापसाची १२.७० लाख क्विंटल खरेदी

SCROLL FOR NEXT