देशभरातील लाॅकडाऊन 17 मे पर्यंत वाढविला : `रेड झोन`साठी सवलत नाहीच
देशभरातील लाॅकडाऊन 17 मे पर्यंत वाढविला : `रेड झोन`साठी सवलत नाहीच 
मुख्य बातम्या

देशभरातील लाॅकडाऊन १७ मे पर्यंत वाढविला : `रेड झोन`साठी सवलत नाहीच

सकाळ वृत्तसेवा

पुणे :  केंद्रीय गृह मंत्रालयाने कोरोना लाॅकडाऊनचा कालावधी दोन आठवडे वाढविला आहे. ४ मेपासून त्याची अंमलबजावणी होणार असून १७ मेपर्यंत लॉकडाऊन असेल. केंद्र सरकारने लागू केलेल्या दुसऱ्या लाॅकडाऊनची मुदत ३ मे रोजी संपत आहे.

प्रत्येक लाॅक डाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी देशाला संबोधून भाषण केले होते. तिसऱ्या  लाॅकडाऊनची घोषणा मोदींनी न करता एका नोटिफिकेशऩद्वारे करण्यात आली. येत्या 17 मे पर्यंत हा लाॅकडाऊन लागू राहणार आहे. ग्रीन आणि आॅरेंज झोनसाठी काही सवलतींची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठीच्या बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. त्यानुसार मजुरांची ने-आण करण्यासाठी खास रेल्वेची व्यवस्था करण्याचे ठरले आहे.

  • ग्रीन आणि आॅरेंज झोनमधील जिल्ह्यासाठी स्वतंत्र सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
  • ग्रीन झोन म्हणजे जिथे कोरोनाची एकही रुग्ण गेल्या 21 दिवसांत सापडलेला नाही.
  • रेड झोन- एकूण रुग्णांची संख्या, वाढीचा वेग, टेस्टिंगचे प्रमाण यावर ठरविण्यात येणार आहे.
  • जे जिल्हे ग्रीन किंवा रेड झोन नसतील ते आॅरेंजमध्ये गृहित धरले जातील.
  • झोन दर आठवड्याला निश्चित केले जातील. राज्यांना रेड किंवा आॅरेंज झोनमध्ये जिल्हे समाविष्ट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांची तीव्रता कमी करण्याचा अधिकार राज्यांना नाही. गेल्या चोवीस तासांत देशांतील कोरोना रुग्णांचा आकडा 35 हजारांहून अधिक झाला आहे. राज्यातील एकूण 14 जिल्हे तर देशातील 120 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. 

    राज्यनिहाय रेडझोन जिल्ह्यांची संख्या

  • उत्तरप्रदेश... १९
  • महाराष्ट्र... १४
  • तामिळनाडू.. १२
  • दिल्ली... १२
  • पश्चिम बंगाल..१०
  • सर्वाधिक ग्रीन झोन जिल्हे

  • आसाम... ३०
  • अरुणाचल प्रदेश..२५
  • छत्तीसगड...२५
  • मध्यप्रदेश..२४
  • ओडिशा..२१
  • उत्तरप्रदेश..२० 
  • महाराष्ट्रातील जिल्हे

  • रेडझोन : मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर, नागपूर , सोलापूर, औरंगाबाद, यवतमाळ, सातारा, धुळे, अकोला आणि जळगाव.
  • ऑरेंज झोन : नगर, अमरावती, सिंधुदुर्ग, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, बीड भंडारा , लातूर, सांगली , परभणी, रायगड, हिंगोली, रत्नागिरी, जालना.
  • ग्रीन झोन : उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

    Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

    Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

    Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

    Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

    SCROLL FOR NEXT