स्थानिक काजूची आवक आजरा तालुक्यात मंदावली Local cashew arrivals slowed down in Ajra taluka
स्थानिक काजूची आवक आजरा तालुक्यात मंदावली Local cashew arrivals slowed down in Ajra taluka 
मुख्य बातम्या

Cashew Market : स्थानिक काजूची आवक आजरा तालुक्यात मंदावली

टीम अॅग्रोवन

आजरा, जि. कोल्हापूर : आजरा बाजारपेठेत स्थानिक काजूची आवक मंदावली आहे. काजू प्रक्रिया युनिट धारकांनी जवळपास ८० टक्के माल खरेदी केल्याने केवळ २० टक्के माल शेतकऱ्यांकडे शिल्लक असल्याचा अंदाज आहे. तालुक्यात एक हजार टनांपेक्षा अधिक परदेशी काजूची खरेदी व्यापारी व कारखानदारांनी केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात याचा फटका स्थानिक मालालाही बसला. काजू खरेदीचा दर मात्र १०० ते ११० रुपये प्रति किलो असा, स्थिर आहे. कोरोनामुळे आठवडी बाजार भरला नसल्याने बाजारपेठामध्ये काजूची आवक मोठ्या प्रमाणात झाली नाही. छोट्या काजू व्यापाऱ्यांनी ग्रामीण भागात जाऊन काजूची खरेदी केली. आजरा शहरात दर वर्षी मार्च ते जून महिन्यापर्यंत व्यापारी काटे लावून खरेदी करत असतात. हे चित्र यंदा दिसले नाही. यंदा शहरात एप्रिल व मे महिन्यांत दिवसाला एक ते दीड टन काजूची आवक होत होती. आता तर काजूची आवक मंदावली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी दराची अधिक प्रतीक्षा न करता माल काजू प्रक्रिया युनिट धारकांना विकला. काही काजू उत्पादक शेतकऱ्यांना दरात वाढ होईल, अशी प्रतीक्षा आहे, पण महिनाभरापासून प्रति किलो १०० ते ११० रुपये, असा दर स्थिर आहे. पुढे यात वाढ होईल, अशी शक्यता कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

आफ्रिकन देशातून काजूची आवक दीड महिन्यांपासून तालुक्यात बेनीन, घाना, टोगो, आयव्हरीकोस्ट, कोगोमोशो, केनीकोनोक्री, नायझेरीया, टान्झानिया यासह आठ आफ्रीकन देशातून देशात काजू बियांची आयात झाली आहे. आजरा तालुक्यातही १००० टनापेक्षा अधिक काजू बीची खरेदी व्यापारी व काजू प्रक्रिया युनिट धारकांनी केली आहे. प्रतिकिलो १०८ रुपयापर्यंत खरेदी झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम स्थानिक काजू बीवर झाला आहे. परदेशी काजू पांढरा, लांबट, आकर्षक गर, काउंट व उताराही चांगला आहे. मॉन्सूनपूर्व पावसाचा परिणाम यंदा वळीव पावसाने उन्हाळ्यात चांगलाच जोर धरला होता. त्याचबरोबर ढगाळ वातावरण राहिल्यामुळे शेतकऱ्यांना काजू बी वाळवताना अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे याचा परिणाम स्थानिक मालाच्या दर्जावर झाला. दरात वाढ व मालाचा उठाव होण्यावर झाली. परदेशातून मोठ्या प्रमाणात काजू बीची आयात होत असल्याने स्थानिक बीच्या दरात वाढ होणे कठीण असल्याचे व्यापारी सांगतात.

प्रतिक्रिया तालुक्यात आफ्रिकन देशातून मोठ्या प्रमाणात काजू बीची आयात होते. या मालाला काजू प्रक्रिया युनिटधारकांकडून मोठी मागणी आहे. याचा परिमाण स्थानिक काजू बी विक्रीवर झाला. स्थानिक मालाचा उठाव कमी झाला आहे. दरही प्रतिकिलो ११० रुपये इतका स्थिर आहे. - अक्षय बिल्ले, काजू व्यापारी, आजरा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT