सूतगिरणीच्या प्रश्नांबाबत विधानमंडळाच्या मंत्रिपरिषद सभागृहात आयोजित बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
सूतगिरणीच्या प्रश्नांबाबत विधानमंडळाच्या मंत्रिपरिषद सभागृहात आयोजित बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 
मुख्य बातम्या

सांगोला सूतगिरणीला होणार कर्जपुरवठा

टीम अॅग्रोवन

नागपूर : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणीला कर्जपुरवठ्याबाबत पंढरपूर को-ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीला शासनाकडून परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.

सूतगिरणीच्या प्रश्नांबाबत विधानमंडळाच्या मंत्रिपरिषद सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सहकार, वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, आमदार गणपतराव देशमुख, आमदार जयंत पाटील, मुख्य सचिव सुमीत मलिक, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वस्त्रोद्योग अपर मुख्य सचिव उज्ज्वल उईके आदी उपस्थित होते.

दुष्काळी भागातील ही सूतगिरणी सातत्याने चांगली चालत आली आहे. या ठिकाणी ९०० हून अधिक कामगार आहेत. तथापि, अलीकडे संचित तोट्यामुळे सूतगिरणीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे १२ कोटी कर्जाची मागणी बँकेकडे केली आहे. या कर्जपुरवठ्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक आहे. ती मिळावी, अशी मागणी आमदार श्री. देशमुख यांनी या वेळी केली.  

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, की या सूतगिरणीला कर्जपुरवठा करण्याबाबत बँकेला शासनाकडून आवश्यक परवानगी दिली जाईल. बँक विहित पद्धतीने नियमानुसार सूतगिरणीला कर्जपुरवठा करू शकेल. दरम्यान याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार देशमुख यांनी त्यांचे आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

SCROLL FOR NEXT