पशुधनाच्या आरोग्यविषयक  सुविधा तत्काळ मिळणार  Livestock health Facilities will be available immediately
पशुधनाच्या आरोग्यविषयक  सुविधा तत्काळ मिळणार  Livestock health Facilities will be available immediately 
मुख्य बातम्या

पशुधनाच्या आरोग्यविषयक  सुविधा तत्काळ मिळणार 

टीम अॅग्रोवन

नागपूर : पशू वैद्यकीय चिकित्सालयीन संकुलामुळे प्राण्यांच्या आरोग्यविषयक शस्त्रक्रिया व औषधोपचाराची सुविधा तत्काळ मिळणार आहे. त्याचबरोबर नागपूरसह छत्तीसगड, मध्य प्रदेशातील पशुधनाला याचा फायदा मिळेल, असे प्रतिपादन दुग्ध व्यवसाय विकास, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केले.  राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ६ कोटी ९१ लाख रुपये निधी खर्चून पशू वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात बांधण्यात आलेल्या पशू वैद्यकीय चिकित्सालयीन संकुलाचे लोकार्पण केंद्रीय रास्ते विकास व महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी अध्यक्षीय भाषणात केदार बोलत होते.  खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार अभिजित वंजारी, माफसूचे कुलगुरू डॉ. ए. एम. पातुरकर, पशू वैद्यकीय महाविद्यालयाचे ए. पी. सोमकुंवर, कार्यकारी परिषदेचे डॉ. सुधीर दिवे, डॉ. संदीप इंगळे, डॉ. वैद्य, डॉ. दुधलकर या वेळी उपस्थित होते.  केदार म्हणाले, ‘‘मध्य भारतात प्राण्यांच्या आरोग्यविषयक सुविधा व औषधोपचारासाठी हे एकमेव संकुल आहे. शेळी व कुक्कुटपालनावर शासनाचा अधिक भर राहणार असून, विदर्भातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे निश्‍चितच चालना मिळणार आहे. ‘सानेन’ या प्रजातीच्या शेळीचे पालन करून दुग्ध उत्पादन वाढीवर भर देण्यात येणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कृषीसह पशुसंवर्धनावर आधारित आहे. त्याच धर्तीवर विदर्भात प्रयत्न केले जातील. विद्यापीठाचे विस्तारीकरण करून ज्ञान सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे. यासाठी ग्रामीण भागात शिबिर आयोजित करा.’’  नितीन गडकरी म्हणाले, ‘‘सर्व सुविधा युक्त असे अत्याधुनिक पशू वैद्यकीय चिकित्सालयीन संकुल नागपूर येथे झाले. त्यामुळे प्राण्यांना आरोग्यविषयक सोयीसुविधा मिळून बाहेरून उपचार करण्याची गरज भासणार नाही. त्याचबरोबर पशुपालकांना इथेच सर्व सुविधा मिळणार आहेत. विदर्भात ६ हजार ५०० हजार मामा तलाव आहेत. त्यामध्ये मत्स्यपालन केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल.’’ पशुपालकांसाठी ‘एम्स किसान पोर्टल’चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक सोमकुंवर यांनी केले तर उपस्थितांचे आभार आखरे यांनी मानले. या कार्यक्रमास पशू व मत्स्य परिषदेचे पदाधिकारी तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT