ग्रामसभेला उपस्थित ग्रामस्थ
ग्रामसभेला उपस्थित ग्रामस्थ 
मुख्य बातम्या

अकोला ठरला विशेष ग्रामसभांच्या थेट प्रक्षेपणाचा पहिला जिल्हा  

टीम अॅग्रोवन

अकोला : जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने प्रथमच शनिवारी (ता.२२) जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभांचे डिजिटल यंत्रणांचा वापर करीत यु ट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. देशात अशा प्रकारचा प्रयोग करणारा अकोला हा पहिला जिल्हा ठरल्याचा दावा केला जात आहे.  

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची ही संकल्पना होती; तर अध्यक्षा संध्याताई वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्ला खाँ पठाण यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा प्रशासनाने आवाहन करीत शनिवारी विशेष ग्रामसभा घेण्याचे सर्व गावांना कळविले होते. यानुसार झालेल्या ग्रामसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरपंचांना पाठविलेल्या विशेष पत्राचे वाचन करण्यात आले.

सोबतच आयुष्मान भारत योजना लाभार्थी यादी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांविषयी सेल्फ तयार करणे, पंतप्रधान आवास योजना, रमाई, शबरी, दीनदयाळ उपाध्याय घरकुल आवास योजनांची पात्र, अपात्र यादी, घरकुल पात्र लाभार्थी यांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत अहवाल तयार करणे, राज्यपुरस्कृत घरकुल लाभार्थी निवड, स्वच्छ भारत मिशन, वाढीव कुटुंब यादी, ३३ कोटी वृक्ष लागवडीबाबत माहिती, शेतकरी सन्मान योजना आदी विषय या सभांमध्ये चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सभेसाठी संपर्क अधिकारी नेमण्यात आले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT