Light showers with thunderstorms in Nashik district
Light showers with thunderstorms in Nashik district 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह हलक्या सरी

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते. शुक्रवारी (ता.१९) पहाटे अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी झाल्या. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण कायम होते. गहू व हरभरा सोंगणी, द्राक्ष काढणी सुरू असताना सरी आल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. निफाड येथील कृषी संशोधन केंद्रावर २.४ मिमी पावसाची नोंद झाली. 

जिल्ह्याच्या अनेक भागात पहाटे विजांचा कडकडाट होता. यासह निफाड, चांदवड, दिंडोरी, पेठ, कळवण व सटाणा तालुक्याच्या अनेक भागात हलक्या पावसाचा शिडकारा झाला. अनेक भागात गहू व हरभरा सोंगणी हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे चांदवड तालुक्यातील काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. पाऊस कमी असूनही थेंबामुळे कांदा डेंगळ्यांचे काही अंशी नुकसान झाले.

कळवण तालुक्यात खरीप कांदा  काढण्याची लगबग असल्याने कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. त्यामुळे अचानक आलेल्या पावसाने सर्वत्र गोंधळ झाल्याचे दिसून आले. पेठ तालुक्यातील अनेक भागात हलक्या सरी झाल्या. मात्र नुकसान झाले नसल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

येवला तालुक्यात ढगाळ वातावरण होते. निफाड तालुक्यात काही ठिकाणी पाऊस झाला. गहू पिकाला फटका बसला. द्राक्ष उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

द्राक्ष उत्पादकांत धास्ती कायम 

ढगाळ वातावरण तयार झाले. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये धास्ती कायम आहे. सध्या द्राक्ष हंगामाचे कामकाज मध्याच्या पुढे आले आहे. त्यात दरात घसरण, व्यापाऱ्यांकडून मर्यादित खरेदी, यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT