Light rain forecast in the state
Light rain forecast in the state 
मुख्य बातम्या

राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भासह उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शनिवारी (ता. २०) दक्षिण कोकणात अनेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे ३० मिलिमीटर, कणकवली २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोल्हापूरमधील चंदगड येथे ३० मिलिमीटर, तर कागल आणि सोलापूरमधील करमाळा येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पाऊस पडला. उस्मानाबाद येथेही १० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.     मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या खालीच आहे. तर कोकण आणि विदर्भात कमाल तापमान अधिक असल्याचे दिसून आले आहे. रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर बहुतांश ठिकाणी किमान तापमानातील वाढ कायम असून, महाबळेश्‍वर येथे नीचांकी १७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :  पुणे ३०.३ (२२), नगर २९.९ (-), जळगाव ३५.० (२२.५), कोल्हापूर २७.७ (२१.९), महाबळेश्‍वर २२.६ (१७.९), मालेगाव ३०.२ (२३), नाशिक २९.२ (२२.३), निफाड ३०.१ (१९.२), सांगली २८.३ (२१.८), सातारा २९.९ (२३.२), सोलापूर - (२१.७), सांताक्रूझ ३४.७ (२७), डहाणू ३२.१ (२६.४), रत्नागिरी ३४.७ (२४.४), औरंगाबाद ३० (२१.७), नांदेड २८.८ (२२.८), परभणी ३०.९ (२३), अकोला ३२.५ (२३.१), अमरावती ३२ (१९.५), ब्रह्मपुरी ३५.८ (२३.३), बुलडाणा ३० (२१.७), चंद्रपूर ३२.२ (२४.२), गडचिरोली ३२.४ (१९), गोंदिया ३०.८ (२१.५), नागपूर ३१.६ (२२.४), वर्धा ३२.२ (२२.९), वाशीम ३३ (-), यवतमाळ ३२.५  (२१.५).

अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र कायम अरबी समुद्रात पूर्वमध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. या प्रणालीपासून महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT