kabuli chana
kabuli chana 
मुख्य बातम्या

काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता कमी 

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे. त्यातच सध्या कोरोनाचा उद्रेक झाल्याने देशभरात लॉकडाउन असल्याने देशांतर्गत बाजार समित्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यातच देशात कोरोनाची स्थिती बिकट झाल्याने अनेक देशांनी आयात बंद केली आहे. त्याचा परिणाम सध्या दरावर झाला असला तरी दर कमी होण्याची शक्यता नाही, अशी माहिती जाणकारांनी दिली.  देशात सध्या कोरोना उद्रेक झाला आहे. त्यामुळे लॉकडाउन जाहीर झाला आहे. त्याचा परिणाम शेतीमालाच्या बाजारावर झाला आहे. काबुली हरभऱ्याला हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लग्न-समारंभातून मोठी मागणी असते. मात्र कोरोनामुळे निर्बंध असल्याने या क्षेत्रांतून मागणी घटली आहे. त्यामुळे देशांतर्गत मागणीवर परिणाम झाला असून, दरात तेजी-मंदीची स्थिती नाही. तसेच आयातदार देशांनी कोरोनामुळे भारतातून आयात जवळपास थांबविली आहे. त्यामुळे दरातील तेजीला ब्रेक लागल्याची स्थिती आहे. मात्र काबुली हरभऱ्याचे दर घसरण्याची शक्यता नाही, असे जाणकारांनी म्हटले आहे.  सध्या सुदान देशातून छोटा काबुली हरभरा देशी काबुली हरभऱ्याच्या तुलनेत कमी दरात मिळत आहे. त्याचाही परिणाम देशातील हरभरा मागणीवर झाला आहे. मात्र कोरोना स्थिती निवळल्यानंतर बाजार पुन्हा पूर्वपदावर येईल आणि दरात तेजी येण्याची शक्यता आहे. सध्या जगात भारत आणि कॅनडा या दोनच देशांत काबुली हरभऱ्याची स्थिती ठीकठाक असल्याचे बोलले जाते. सध्या ऑस्ट्रेलिया आणि कॅनडात मिळून ३.१५ लाख टन साठा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जागतिक पातळीवर भारत आणि कॅनडातूनच निर्यातीची शक्यता आहे. कोरोनाचे संकट गेल्यानंतर भारतातून निर्यात वाढण्याची शक्यता असून दरही वाढतील, असे जाणकारांनी सांगितले.  बाजारावर लॉकडाउनचा परिणाम  देशातील बाजार समित्यांच्या कामकाजावर लॉकडाउनमुळे परिणाम झाला आहे. बाजार समित्यांत खरेदी-विक्रीचे व्यवहार नगण्य होत आहेत. लॉकडाउनमधून सरकारने या वेळी वाहतुकीला वगळले असले, तरी मालच येत नसल्याचा त्याचा लाभ होताना दिसत नाही. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूसारख्या राज्यांतील जास्त पुरवठा असणाऱ्या बाजार समित्या बंद आहेत किंवा व्यवहार कमी आहेत.  जागतिक स्थिती 

  • जागतिक पातळीवर उत्पादन घटण्याची शक्यता 
  • कोरोनामुळे पुरवठा कमी असूनही तेजी नाही 
  • बाजार समित्या बंद असल्याचाही दरावर परिणाम 
  • पाकिस्तानने आयात वाढविली 
  • ऑस्ट्रेलिया, कॅनडात ३.१५ लाख टन साठ्याची शक्यता 
  • भारत आणि कॅनडातच साठा उपलब्ध 
  • इतर देशांत साठा कमी, निर्यातीची शक्यताही कमीच
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

    Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटेची शक्यता

    Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

    Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

    Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

    SCROLL FOR NEXT