भगवानगडाच्या पायथ्याला बिबट्याचा महिलेवर हल्ला Leopard attacks a woman at the foot of Bhagwangada
भगवानगडाच्या पायथ्याला बिबट्याचा महिलेवर हल्ला Leopard attacks a woman at the foot of Bhagwangada 
मुख्य बातम्या

भगवानगडाच्या पायथ्याला बिबट्याचा महिलेवर हल्ला

टीम अॅग्रोवन

नगर  : पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या भगवानगड लमाणतांड्यावरील महिलेवर बिबट्याने शनिवारी हल्ला केला. दोन्ही पायांनी अधू असलेले पती मदतीला धावल्याने महिलेचे प्राण वाचले. दिव्यांग पतीने हातातील काठीने त्यांनी बिबट्याचा प्रतिकार सुरूच ठेवल्याने बिबट्याला माघार घेत तेथून पळ काढावा लागला.  वन विभागाने आतापर्यंत तीन बिबट्याला पकडले असतानाही पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या श्रीक्षेत्र भगवानगडाच्या परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्या दिसला होता. मात्र, त्यावेळी दुर्लक्ष झाले. शनिवारी (ता. २१) गडाच्या पायथ्याशी असलेल्या तांड्यावरील छबूबाई राठोड (वय ४५) व दिव्यांग पती एकनाथ राठोड डोंगरालगतच्या शेतात काम करीत होते. सायंकाळी चारच्या सुमारास बिबट्याने छबूबाई यांच्यावर अचानक झडप घातली. या प्रकाराने गांगरलेल्या छबूबाई यांनी जोरजोरात आरडाओरडा केला. बिबट्याने तोंडावर पंजा मारल्याने छबूबाई गंभीर जखमी झाल्या. जवळच असलेले दिव्यांग पती एकनाथ राठोड हातात काठी घेत मदतीसाठी धावले. काठीने त्यांनी बिबट्याला प्रतिकार सुरू केला. अखेर बिबट्याने माघार घेतली.  गंभीर जखमी अवस्थेत छबूबाई यांना खरवंडी येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. वनाधिकाऱ्यांनी सायंकाळी घटनास्थळाची पाहणी केली. छबूबाई राठोड यांचे पती एकनाथ हे दोन्ही पायांनी अधू आहेत. चालण्यासाठी त्यांना काठीचा आधार घ्यावा लागतो. तीच काठी आज पत्नीचे प्राण वाचविताना मदतीला आली. दिव्यांग असतानाही पत्नीचे रक्षण करणाऱ्या एकनाथ राठोड यांचे गावकऱ्यांनी कौतुक केले. मात्र बिबट्याच्या भीतीने शेतकरी पुरते धास्तावले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

SCROLL FOR NEXT