मुख्य बातम्या

वऱ्हाडातील शेतकरी आंदोलनाचा नेत्यांनी घेतला धसका

टीम अॅग्रोवन

नागपूर  ः भारतीय जनता पक्षाचा गड असलेले अकोलाच आता शेतकरी आंदोलनाचे केंद्र म्हणून नावारूपास येत असल्याने स्थानिक भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. स्थानिक नेत्यांऐवजी आयात नेत्यांच्या बळावर शेतकरी आंदोलन होत असल्याच्या मुद्द्याला त्या पार्श्‍वभूमीवर हवा दिली जात असून, निवासाकरिता विश्रामगृहदेखील मिळू नये याकरितादेखील प्रयत्न केले गेल्याने भाजपमधील अस्वस्थतेची चर्चा रंगली आहे.  विदर्भ आणि त्यातही पश्‍चीम विदर्भ, वऱ्हाड हा भाजप-शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जातो. जातीय समीकरणाच्या बळावर भाजप नेत्यांनी येथे आपले वर्चस्व कायम ठेवले. नजीकच्या काळात या गडाला भगदाड पाडण्याचे काम शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून होत आहे. खासदार नाना पटोले यांनी वऱ्हाडात आपल्या आंदोलनाची सुरवात अकोल्यातून केली. त्यानंतर प्रहारचे आमदार बच्चू कडू, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनीदेखील शेतकरी आंदोलनाची सुरवात अकोल्यातूनच केली. शेतकरी जागर मंचच्या झेंड्याखाली हे नेते एका व्यासपीठावर आले. शेतकरी आंदोलनासाठी अकोलाच का, या प्रश्‍नामुळे स्थानिक भाजप नेतृत्वामध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातूनच आयात नेत्यांच्या बळावर सुरू असलेले हे आंदोलन दिशाहीन असल्याचे आणि टिकाऊ नसल्याची चर्चा घडवून आणली जात आहे. दरम्यान, कासोधा (कापूस, सोयाबीन, धान) परिषदेच्या निमित्ताने माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजपच्या नाराज गोटातील यशवंत सिन्हा रविवारी (ता. ३) अकोल्यात आले होते. त्याच दिवशी समांतर शेतकरी परिषद अकोला जिल्ह्यातच आयोजित करण्यात आली. कासोधा परिषदेला गर्दी कमी व्हावी, असा प्रयत्न त्यामागे असल्याचे सांगितले जाते. यशवंत सिन्हा मुक्‍कामी राहणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर तडकाफडकी एका नेत्याकडून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विश्रामगृहाच्या सर्वच्या सर्व खोल्या आरक्षित करण्यात आल्या. यशवंत सिन्हा यांना राहण्याकरिता सूट मिळू नये याकरिता ही खबरदारी घेण्यात आली, अशी चर्चा आणि आरोपही शेतकरी नेत्यांमधून होऊ लागला आहे. त्यातच वाण प्रकल्पाचे पाणी अकोला शहराकरिता आरक्षित करण्याच्या मुद्द्यावरूनदेखील सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांनी वेठीस धरले आहे. अशाप्रकारे शेतीप्रश्‍नावरून चौफेर घेराबंदी झाल्याने नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT