खारफुटी जंगल
खारफुटी जंगल  
मुख्य बातम्या

महाराष्ट्रातील पानथळ क्षेत्र, खारफुटी जंगलात वाढ

टीम अॅग्रोवन

मुंबई  : जलयुक्त शिवार योजना, पानथळ विकास कार्यक्रम आदींच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्याच्या जंगलातील पानथळ क्षेत्रात वाढ झाली असून राज्यातील खारफुटी जंगलही ८२ चौरस किलोमीटरने वाढल्याचे देशाच्या वार्षिक वन अहवालातून स्पष्ट झाले आहे. केंद्रीय वने, पर्यावरण व हवामानबदल मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी वने विभागाचा वर्ष - २०१७ अहवाल सादर केला. या अहवालानुसार देशाच्या एकूण वनाच्छादित क्षेत्र ८ हजार २१ चौरस किलोमीटरची वाढ झाली असून जगात भारताचा १० वा क्रमांक लागतो. या अहवालानुसार जंगलातील पानथळ क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याच्या जंगलातील पानथळ क्षेत्र ४३२ चौरस किलोमीटर आहे तर ४२८ चौरस किलोमीटरसह गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. यादीत ३८९ चौरस किलोमीटरसह मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे.

खारफुटी जंगल क्षेत्रात वाढ  देशातील खारफुटी जंगलात एकूण १८१ चौरस किलोमीटर एवढी वाढ झाली असून यात एकटया महाराष्ट्राचा वाटा ८२ चौरस किलोमीटर एवढा आहे. राज्यातील ठाणे (३१), रायगड (२९), मुंबई उपनगर (१६), सिंधुदूर्ग(५), रत्नागिरी(१) आणि मुंबई शहर (शून्य) या जिल्ह्यांचा समावेश आहे.

दृष्टिक्षेपात महाराष्ट्रातील वनक्षेत्र  अहवालानुसार महाराष्ट्राचे एकूण भौगोलीक क्षेत्र ३ लाख ७ हजार ७१३ चौरस किलोमीटर आहे. यापैकी ५० हजार ६८२ चौरस किलोमीटर क्षेत्र वनव्याप्त असून ते भौगालिक क्षेत्राच्या १६.४७ टक्के आहे. यात ८ हजार ७३६ चौरस किलोमीटर हे अती घनदाट जंगल, २० हजार ६८२ मध्यम घनदाट जंगल, २१ हजार २९४ चौरस किलोमीटर विरळ जंगल तर ४ हजार १६० चौरस किलोमीटर खुरटे जंगल आहे.                               राज्यातील डोंगराळ जिल्ह्यातील वनक्षेत्र राज्यात एकूण ७ डोंगराळ जिल्हे असून त्यांचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६९ हजार ९०५ एवढे आहे. यापैकी १५ हजार ६२० हे वनक्षेत्र असून ते २२.३४ टक्के आहे. एकूण वनक्षेत्रात अती घनदाट जंगल ३१५, मध्यम घनदाट जंगल ७ हजार २४५, विरळ जंगल ८ हजार ५९ आणि खुरटे जंगल १ हजार ४१५ चौरस किलोमीटर आहे. आदिवासी जिल्ह्यातील वनक्षेत्र राज्यात एकूण १२ आदिवासी जिल्हे असून त्यांचे भौगोलिक क्षेत्र १ लाख ४४ हजार २३३ आहे. यापैकी ३० हजार ५३७ चौरस किलोमीटर वनक्षेत्र असून ते २१.३३ टक्के आहे. यात ७ हजार २२९ चौरस किलोमीटर अती घनदाट जंगल, ११ हजार ६९५ चौरस किलोमीटर मध्यम घनदाट जंगल, ११ हजार ६१३ विरळ जंगल तर २ हजार १७७ खुरटे जंगल आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT