Last season’s crop insurance has yet to be received
Last season’s crop insurance has yet to be received 
मुख्य बातम्या

अकोला : गतहंगामातील पीक विम्यापासून शेतकरी वंचित

टीम अॅग्रोवन

अकोला ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी काढलेल्या सोयाबीन पिकाचा विमा अद्यापही मिळाला नसल्याची बाब समोर आली आहे. हा लाभ किती दिवसांनी मिळेल असा प्रश्न शेतकरी प्रशासनाला करीत आहेत. कौलखेड मंडळातील शिवापूर, चांदूर, आकोली आणि सोमठाणा या चार गावांतील शेतकरी पंतप्रधान पीकविमा नुकसानभरपाईपासून वंचित आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या चार गावांतील शेतकऱ्यांनी गेल्या हंगामात पीक उतरविला होता. परंतु, त्यांना कुठलीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. या बाबत शेतकऱ्यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदन दिले आहे. या शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता खडकी येथील जिल्हा बँकेच्या शाखेत भरला होता. परंतु, आजवर कुठलीही मदत न मिळाल्याने शेतकरी डावलल्याची बाब समोर आली.

या बाबत माजी सरपंच प्रल्हाद ढोरे यांनी प्रशासनाकडे माहिती घेतली असता स्थानिक पातळीवर संबंधित विमा कंपनीचा कोठलाही अधिकारी नाही. शेतकऱ्यांनी बँकेकडे विचारणा केली तर त्यांना संबंधित विमा कंपनीच्या दिल्लीस्थित कार्यालयाचा पत्ता देण्यात आला. त्यामुळे वंचित राहिलेल्या या शेतकऱ्यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन देत मदतीची मागणी केली आहे. मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आम्ही शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्यासाठी सर्व आवश्‍यक कागदपत्रे दिली होती. वेळेत विमा रक्कम भरली. तरीही कौलखेड महसूल मंडळातील शेकडो शेतकरी २०१९-२० च्या खरीप हंगामातील सोयाबीन पीकविम्याच्या रकमेपासून वंचित आहेत. या विमा कंपनीचे कार्यालय केवळ मुंबई व दिल्ली येथे असल्याने शेतकऱ्यांना कंपनीकडे संपर्क साधणे सुद्धा शक्य होत नाही. आता काय करावे असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. - प्रल्हाद ढोरे, शेतकरी, शिवापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT