मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
मुख्य बातम्या

समृद्धीकरिता डिसेंबरपर्यंत जमीन अधिग्रहण पूर्ण होणार

टीम अॅग्रोवन

नागपूर  ः समृद्धी महामार्गाच्या उभारणीतील बहुतांश अडथळे दूर झाले आहेत. डिसेंबरपर्यंत या प्रकल्पासाठी जमिनी अधिग्रहणाचे काम पूर्ण होईल आणि जानेवारी २०१८ मध्ये महामार्गाचे भूमिपूजन होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी रविवारी (ता. २२) ‘रामगिरी’वर पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले, की समृद्धी महामार्गासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत ५० टक्‍के जमीन खरेदीचे काम पूर्ण होईल. डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून जानेवारी २०१८ मध्ये या महामार्गाचे भूमिपूजन केले जाईल. अडथळे दूर झाले आहेत. कोरियाकडून पतपुरवठा होत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी संपल्या आहेत.  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, की राणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळातही येतील. राज्यात सध्या ६०२ अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती फारच कमी होत चालली आहे. येत्या काळात ५० टक्‍के उपस्थिती अनिवार्य केली जाणार आहे. त्याकरिता बायोमॅट्रिक व्यवस्था केली जात आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT