समृद्धी महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात मालेगाव तालुक्यात भूसंपादन
समृद्धी महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात मालेगाव तालुक्यात भूसंपादन 
मुख्य बातम्या

समृद्धी महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात मालेगाव तालुक्यात भूसंपादन

टीम अॅग्रोवन

वाशीम : जिल्ह्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गासाठी बुधवारी (ता. ७) पोलिस बंदोबस्तात जमीन संपादित करण्यात आली. या वेळी शेतकऱ्यांनी मोबदला कमी मिळत असल्याने विरोध केला. तरीही यंत्रणांनी पोलिस बंदोबस्तात पिकांवर जेसीबी फिरवून भूसंपादन केल्याने रोष व्यक्त होत आहे. समृद्धी महामार्ग जात असलेल्या मालेगाव तालुक्यातील रिधोरा, वारंगी, सुकांडा आणि अनसिंग येथे शेतकऱ्यांची जमीन ओलिताची असतानाही कोरडवाहू दाखवून मोबदला दिला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे शेतकरी जमीन देण्यास नकार देत आहेत. समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून संपादनाची राहिलेली जमीन ताब्यात घेण्यासाठी बुधवारी अधिकारी या गावांमध्ये पोचले. शेतकऱ्यांनी पेरणी केलेली असून त्यावर जेसीबी मशीन चालविण्यात आले. महसूल, पोलिस खात्याचे अधिकारी फौजफाट्यासह आल्याने शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यात आला. जबरदस्तीने होत असलेल्या भूसंपादनाला विरोध म्हणून शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. या वेळी उपविभागीय अधिकारी राऊत, पोलिस उपअधीक्षक बनसोड, तहसीलदार आर. ए. काळे यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते. 

वारंगी येथे विजयकुमार दहात्रे यांच्या नावे असलेल्या शेतीत डाळिंबाच्या बागेसह इतर पिके आहेत. असे असतानाही तलाठ्याच्या चुकीने हे क्षेत्र कोरडवाहू दाखविले आहे. आता समृद्धीमध्ये ही जमीन जात असून त्याचा मोबदला कोरडवाहूच्या दराने दिला जात असल्याने विरोध आहे.  - राजकुमार दहात्रे, वारंगी, ता. मालेगाव जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT