In the absence of diesel, the kharipa prefix has been postponed
In the absence of diesel, the kharipa prefix has been postponed 
मुख्य बातम्या

डिझेल अभावी खरिपाची पूर्वतयारी रखडली 

टीम अॅग्रोवन

आटपाडी, जि. सांगली : संचार बंदीमुळे ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेली शेती व्यवसायाशी संबंधित डिझेल अभावी खरीप पूर्वतयारी कामे पूर्ण ठप्प पडली आहेत. ट्रॅक्‍टर चालकांना वीस लिटर डिझेलसाठी ट्रॅक्‍टर घेऊन पंपावर वाऱ्या कराव्या लागतात. यामुळे जवळपास तालुक्‍यातील एक हजार वर ट्रॅक्‍टर पूर्ण विश्रांती घेत आहेत. दरम्यान, अत्यावश्‍यक सेवा समजून शेतीकामांसाठी लागणाऱ्या यंत्रणांना प्रशासनाने इंधन उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. 

आटपाडी तालुक्‍यात रब्बीचा हंगाम संपला आहे. ज्वारीची काढणी झाली आहे. अनेक शेतात कडबा तसाच पडून आहे. हंगाम संपल्यानंतर शेतकरी खरीप पूर्वतयारीच्या कामाला लागतात. अनेक शेतकरी नांगरणी आणि खुरटणी करतात. तसेच शेणखत शेतात सोडले जाते. माॅन्सूनचा पाऊस झाल्यानंतर शेतकरी बाजरी, मका, भुईमूग याची पेरणी करतात पण त्यासाठीची करावी लागणारी तयारी सध्या पूर्ण ठप्प आहे. 

तालुक्‍यात छप्पन गावात एक हजारावर ट्रॅक्‍टर आहेत. लहान गावातही दहा-पंधरा ट्रॅक्‍टर सहज आढळतात. शेतकऱ्याची कडबा घरी आणून नांगरट आणि मशागत करण्यासाठी धडपडत चालली आहे. पण ट्रॅक्‍टर मिळत नाहीत तर ट्रॅक्‍टर चालकांना अपेक्षित डिझेल मिळत नसल्यामुळे ट्रॅक्‍टर धक्‍याला लावले आहेत. ट्रॅक्‍टरला डिझेल देण्याचा प्रशासनाने फतवा काढला. तलाठी आणि ग्रामसेवकाच्या सहीचे पत्र आणि सोबत ट्रॅक्‍टर घेऊन गेल्यानंतरच पंप चालक जेमतेम वीस लीटर तेल देतात. 

खेडेगावातून तालुक्‍यात पंपावर ये-जा करण्यासाठी पाच-सात लीटर तेल जाते. राहिलेल्या तेलातून एक दिवस ही मशागत होत नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी ग्रामसेवक तलाठी यांचे नवीन पत्र आणि पंपाची वारी करावी लागते. यामुळे ट्रॅक्‍टर उभा करणे पसंत केले आहे. 

तालुक्‍यात ५६ गावे असून करगणी, आटपाडी, दिघंची, झरे आणि खरसुंडी या पाच ठिकाणीच पंप आहेत. येथून ग्रामीण गावे आठ, दहा, पंधरा वीस किलोमीटर अंतरावर आहेत. डिझेलसाठी रोजचा प्रवास परवडत नाही. ज्या गावात पंप आहेत तेथील प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. इतर पन्नास गावांत मात्र डिझेल अभावी शेती कामे ठप्प आहेत. पूर्वतयारीच नसल्यामुळे पुढच्या पेरणी होतील का याबद्दल साशंकता आहे. 

पालकमंत्री यांच्या आढावा बैठकीत हा प्रश्न मांडला होता. यावर ट्रॅक्‍टरना ज्यादा आणि आणि केडात तेल देण्याचा सूचना पालकमंत्री केल्या आहेत  - वृषाली पाटील, सरपंच, आटपाडी. 

पात्रेवाडी पासून आटपाडी १८ किलोमीटर आहे. वीस लीटर तेलासाठी तेवढा ट्रॅक्‍टर घेऊन जाण परवडत नाही. त्यामुळे ट्रॅक्‍टर उभा केला आहे. दुसरा पर्याय नाही.  - भीमराव जाधव, शेतकरी पात्रेवाडी. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT