निमोण, जि. नाशिक : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याचा लागवड हंगाम सुरू झाला आहे. लागवडीलाच मजूरटंचाई भासत असल्याने कांदा उत्पादकांसमोर संकट उभे राहिले आहे.  (छायाचित्र : भाऊसाहेब गोसावी)
निमोण, जि. नाशिक : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याचा लागवड हंगाम सुरू झाला आहे. लागवडीलाच मजूरटंचाई भासत असल्याने कांदा उत्पादकांसमोर संकट उभे राहिले आहे. (छायाचित्र : भाऊसाहेब गोसावी) 
मुख्य बातम्या

उन्हाळ कांदा लागवडीला मजूरटंचाईचा अडथळा

टीम अॅग्रोवन

नाशिक  : दिवाळीनंतर उन्हाळ कांदा लागवडीला नाशिक जिल्ह्यात वेग आला आहे. यंदा जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये झालेला जोरदार पाऊस आणि सध्या कांद्याला मिळणारे चांगले दर, यामुळे कांदा क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे; मात्र शेतमजुरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा पैसे देऊन मजूर मिळवावे लागत असल्याने फक्त कांदा लागवडीचा प्रतिएकर खर्च सात हजारांवर पोचला आहे.

कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याचे नाव देशभरात आघाडीवर आहे. लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीतून तर जगभरात कांद्याची निर्यात केली जाते. सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला असतानाच आता उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे कांदा आतापासूनच शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणू लागला आहे.

शेतकऱ्यांना एकर किंवा गुंठेवारीनुसार मजुरांकडून लागवड करून घ्यावी लागते; मात्र त्यासाठी एका एकराला सात ते साडेसात हजार रुपये मोजावे लागत आहेत. मजुरांची मागणी वाढल्यास या रकमेत अधिक वाढ होते. शिवाय मजूर दुसऱ्या गावातून आणण्याची वेळ पडल्यास वाहतुकीवरही अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांनाच करावा लागत आहे. मागील वर्षीच्या प्रमाणात यंदा मजुरीत वाढ झाली असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT