कृषी कल्चर
कृषी कल्चर 
मुख्य बातम्या

पुण्यात उद्या रंगणार ‘कृषी कल्चर’ ज्ञान सोहळा

टीम अॅग्रोवन

पुणे ः कुशल, स्मार्ट आणि सुरक्षित शेतीसाठी लागणारे कौशल्य, समूह विकास, समूह शेती, गटशेतीचं तंत्र तसेच अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणारा अनोखा ‘कृषी कल्चर’ ज्ञान सोहळा उद्या (ता.१) पुण्यात होत आहे. एपी ग्लोबाले समूहातर्फे होणाऱ्या या सोहळ्यासाठी राज्यभरातील शेतकरी सहभागी होत आहेत. या ज्ञान सोहळ्याचे उद़़़्घाटन सकाळी १० वाजता कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्‍ते होणार आहे.  स्मार्ट व शाश्वत शेतीबाबत जागर घडवून आणणारा हा ज्ञान सोहळा येरवडा येथील डेक्कन कॉलेजमध्ये होत आहे. एमएसीसीआयए, चतुर आयडीयाज एक्सक्यूबेटर, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, बोलेरो मॅक्सीट्रक प्लस, बोलेरो पीक अप, गोदरेज ॲग्रोवेट, इंडोफील इंडस्ट्रीज लिमिटेड आणि कृषिकिंग हे या सोहळ्याचे प्रायोजक आहेत.  महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक श्वेता शालिनी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, कृषी खात्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, रुरल रिलेशन्सचे संस्थापक प्रदीप लोखंडे, इंडोफिल इंडस्ट्रिजचे उत्पादन व्यवस्थापक महेश पवार आदी मान्यवर ‘कृषी कल्चर’मध्ये मार्गदर्शन करणार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासोबतच कृषी क्षेत्रातील नवउद्योजक व महिला शेतकऱ्यांच्या यशोगाथा ऐकण्याची संधी ‘कृषी कल्चर’मध्ये मिळेल. राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानशी संबंधित संशोधकांचे नावीन्यपूर्ण संशोधन या वेळी पाहता येणार आहे.  कृषी कल्चर परिषदेचे उद्देश

  • शाश्वत शेती आणि सर्वांगीण सामूहिक ग्रामविकासाची वाट चोखाळणे
  • शेतकऱ्यांना आदर्श शेतीपद्धती आणि नवीन तंत्रज्ञानाच ओळख करून देणे
  • स्मार्ट शेतकरी बनण्याकडे वाटचाल. समूहशक्तीचा जागर करून गटशेतीची कास धरणे
  • मार्केट लिंकेजेस विकसित करण्याची गुरुकिल्ली
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

    Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

    Grain Storage : देशातील धान्य साठवणूक अन् वितरण व्यवस्था

    Water shortage : जायकवाडी धरणाने वाढवली छ. संभाजी नगरकरांची चिंता; धाराशिवला टँकरचा आधार

    Tomato Disease : टॉमॅटो पिकातील ‘लवकर येणारा करपा’

    SCROLL FOR NEXT