हुमणी भुंगेरे
हुमणी भुंगेरे 
मुख्य बातम्या

क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी करणार 

टीम अॅग्रोवन

कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण अभियानांतर्गत क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यामार्फत शेतकऱ्यांनी गोळा केलेले हुमणीचे भुंगेरे तीनशे रुपये किलो या दराने खरेदी करणार असलेची माहिती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी पत्रकाद्वारे दिली.  या योजनेविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘‘कारखाना कार्यक्षेत्रात ७१ गावे आहेत. या सर्वच गावामध्ये ऊस, सोयाबीन, भुईमूग या पिकाला हुमणीचा प्रादुर्भाव सन २०१२ मध्ये सर्व प्रथम दिसून आला. हुमणी नियंत्रणासाठी कारखान्यामार्फत मागील वर्षापासून अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तथापि, सामुदायिक प्रयत्न न केल्यामुळे हुमणीचा संपूर्ण बंदोबस्त होऊ शकलेला नाही. हुमणीमुळे कार्यक्षेत्रात दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे उसाचे उत्पन्न व लाखो रुपये औषधावर खर्च होत आहे.’’ ‘हुमणीच्या सर्व अवस्था जमिनीत राहतात त्यामुळे प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाय योजना केल्यामुळे नियंत्रण करणे कठीण जाते. उन्हाळ्यातील वळीवाचा पाऊस झाल्यानंतर हुमणीचे भुंगेरे जमिनीतून बाहेर येतात व शेतातील लिंब, बाभूळ बोर या झाडांवर सायंकाळी जमा होतात. हे भुंगेरे गोळा करण्याच्या कामात शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा व अळी निर्माण होण्यापूर्वीच हुमणी नष्ट व्हावी, या हेतूने कारखान्याने शेतकऱ्यांनी गोळा केलेले भुंगेरे योग्य दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे भुंगेरे १५ मार्च ते १५ जून या कालावधीत आठवड्यातून प्रत्येक मंगळवार व शुक्रवारी कार्यालयीन वेळेत ऊसविकास विभागाकडे जमा करून, जाग्यावर वजनाप्रमाणे रोखीने रक्कम दिली जाईल असे सांगून, कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी या कामामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे,’ असे आवाहन त्यांनी केले.  या वेळी क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, उपाध्यक्ष आत्माराम हारूगडे, कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे, सचिव वसंत, लाड व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT