‘वर्ल्ड टुरिझम’मध्ये कोकण महत्त्वाचं ठिकाण ठरेल
‘वर्ल्ड टुरिझम’मध्ये कोकण महत्त्वाचं ठिकाण ठरेल 
मुख्य बातम्या

‘वर्ल्ड टुरिझम’मध्ये कोकण महत्त्वाचं ठिकाण ठरेल : मुख्यमंत्री

टीम अॅग्रोवन

पुणे : ‘‘वृक्षराजी, तळी आणि गोव्यापेक्षा चांगले सागरकिनारे यामुळे ''वर्ल्ड टुरिझम''मध्ये कोकण महत्त्वाचं ठिकाण ठरेल,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कोकण भूमी प्रतिष्ठान आणि ग्लोबल कोकण फेस्टिव्हल आयोजित ७ व्या ग्लोबल ‘कोकण फेस्टिव्हल’चे उद्‌घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेस्से ग्लोबल एक्झिबिशन सेंटर, मगरपट्टा सिटी, हडपसर येथे नुकतेच (ता. १) झाले. या वेळी समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, महापौर मुक्ता टिळक, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, विजय गोगावले, किशोर धारिया उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, की कोकण भूमी प्रतिष्ठान, ग्लोबल कोकण फेस्टिव्हलने सातत्यपूर्ण कामातून कोकणचे ब्रॅंडिंग, मार्केटिंग करण्यासाठी प्रयत्न केले, हे कौतुकास्पद आहे. वृक्षराजी, तळी आणि गोव्यापेक्षा चांगले सागरकिनारे यामुळे ''वर्ल्ड टुरिझम''मध्ये कोकण महत्त्वाचं ठिकाण ठरेल. पर्यटनवृद्धीसाठी ५ गावे कोकण भूमी प्रतिष्ठानने निवडली असून, तेथे होम स्टे, टुरिझम वृद्धिंगत केले जाणार आहेत, हे महत्त्वाचे पाऊल आहे. सरकारही कोकण विकासासाठी प्रयत्न करीत असून, चिपी विमानतळ, रत्नागिरी विमानतळ, दिघी बंदर आणि चौपदरीकरण होत असलेला मुंबई-गोवा महामार्ग यामुळे कोकणची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

फेस्टिव्हल आज (ता. ४) रात्री १० पर्यंत सुरू राहणार आहे. कोकणची संस्कृती, कला, रोजगार, बांधकाम व्यवसाय, स्टार्टअप, पर्यटन, गुंतवणूक, फळ प्रक्रिया, खाद्यसंस्कृतीविषयक स्टॉल या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. फेस्टिव्हलचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी प्रास्ताविक केले. सहसंयोजक एम. क्यू. सय्यद यांनी स्वागत केले. कोकणातील यशस्वी उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Varieties Conservation : स्थानिक जातींच्या संवर्धनासाठी आधुनिक बियाणे बॅंक

Agriculture Technology : गाईच्या शेणापासून बनविले ‘गोबायर’

Condensing Economizer : बायोगॅस ज्वलनातून मिळेल शुद्ध पाणी

Sugarcane Bills : शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही, पांटबंधारे विभागाची वसुलीसाठी कसरत

Onion Export Ban : संवेदनशील कांदा, असंवेदनशील राज्यकर्ते

SCROLL FOR NEXT