कोकणात पावसाच्या सरी
कोकणात पावसाच्या सरी 
मुख्य बातम्या

कोकणात पावसाच्या सरी

टीम अॅग्रोवन

पुणे : कोकण किनारपट्टीवर पावसाच्या सरी बरसण्यास सुरवात झाली आहे. तर घाटमाथा, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. उद्यापासून (मंगळवार) कोकणात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, बुधवारपासून (ता. २०) या भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून) वाटचालीस पोषक स्थिती नसल्याने आणखी काही दिवस माॅन्सूनची वाटचाल जैसे थे राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.  मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्यानंतर राज्यात हळूहळू पावसाला सुरवात झाली अाहे. रविवारी (ता. १७) सकाळपासून कोकण किनारपट्टी ढगांची दाटी झाली, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलके ढग जमा झाले होते. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडल्या.  

वसई, भिवंडी, देवगड, मालवण, सांताक्रूझ, गुहागर, तलासरी, ठाणे, डहाणू येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. घाटमाथ्यासह, सह्याद्रीच्या पूर्व उतारवरील जावळी मेढा, पाटण, लाेणावळा, इगतपुरी आदी भागांत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. मराठवाडा आणि विदर्भात मात्र मुख्यत: कोरडे हवामान होते. आज (ता. १८) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता अाहे.    

रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे उच्चांकी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.७, जळगाव ४०.०, कोल्हापूर ३१.५, महाबळेश्वर २०.३, मालेगाव ३९.०, नाशिक ३१.१, सातारा ३१.१, सोलापूर ३५.६, मुंबई ३२.१, अलिबाग ३०.२, रत्नागिरी ३१.७, डहाणू ३३.१, आैरंगाबाद ३४.६, परभणी ३७.७, नांदेड ३५.०, अकोला ३९.२, अमरावती ३८.६, बुलडाणा ३६.८, ब्रह्मपुरी ३९.८, चंद्रपूर ४०.४, गोंदिया ३९.६, नागपूर ३९.८, वर्धा ४०.०, यवतमाळ ३७.५. 

रविवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्रोत - हवामान विभाग) : 

  • कोकण : वसई ८०, भिवंडी, दवगड प्रत्येकी ७०, मालवण, सांताक्रूझ प्रत्येकी ६०, गुहागर, तलासरी, ठाणे, डहाणू प्रत्येकी ५०, उरण, कुडाळ प्रत्येकी ४०, रत्नागिरी, हर्णे, संगमेश्‍वर, सावंतवाडी, वैभववाडी, तळा, म्हसळा, पेण, श्रीवर्धन, कल्याण, चिपळूण, मोखेडा प्रत्येकी ३०.
  • मध्य महाराष्ट्र : जावळी मेढा ४०, पाटण ३०, लोणावळा, इगतपुरी, महाबळेश्‍वर, राधानगरी प्रत्येकी २०. गगनबावडा, कराड, पेठ, अाजरा प्रत्येकी १०.   
  • घाटमाथा : ताम्हिणी ४०, शिरगाव, वळवण, दावडी, डुंगरवाडी, कोयना नवजा प्रत्येकी २०. 
  • मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव : विहार ८०, तानसा ५०, तुलसी, मध्य वैतरणा प्रत्येकी २०. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

    Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

    Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

    Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

    SCROLL FOR NEXT