कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला  
मुख्य बातम्या

कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला 

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर सोमवारी (ता. १) ओसरला. शहरासह व पूर्व भागातील अनेक तालुक्‍यांत किरकोळ सरी वगळता दुपारपर्यंत केवळ ढगाळ हवामान राहिले. अनेक ठिकाणी ऊन-सावल्यांचाच खेळ सुरू होता. जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील धरण क्षेत्रात पावसाची भुरभूर कायम होती. सोमवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील दहा बंधारे पाण्याखाली होते. राधानगरी धरणाच्या पाण्यात चार फुटांनी वाढ झाल्याचे धरणाच्या सूत्रांनी सांगितले. सोमवारी सकाळपासून मात्र धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी होता.

हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर तालुक्‍यांत बहुतांशी करून ढगाळ हवामान राहिले. पन्हाळा, गगनबावडा तालुक्‍यांत थांबून थांबून हलक्‍या मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी सुरू होत्या. जिल्ह्यात सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक ८४ मिमी तर शिरोळ तालुक्‍यात सर्वात कमी ९ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील राधानगरी धरणात आज अखेर ६४.५८ दलघमी पाणीसाठा आहे.

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ हे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे हे चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत व वेदगंगा नदीवरील वाघापूर, निळपण, कुरणी, सुरुपली व बस्तवडे हे पाच बंधारे पाण्याखाली गेले असून एकूण १६ बंधारे पाण्याखाली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Fodder Cultivation Plan: पुणे जिल्ह्यात १० हजार १०० हेक्टरवर चारा लागवड; सध्याचा साठा फक्त तीन महिन्यांसाठी

Soybean Crop Damage: पाण्याअभावी सोयाबीन पीक करपले; खेड तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात

Mission Mausam: ‘मिशन मौसम’अंतर्गत हवामान निरीक्षणासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि कृषी विद्यापीठात करार

Farmer Financial Assistance: चार नोव्हेंबरपूर्वी शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत मिळणार

Sitaphal Fruit Production: कमी पावसाचा सीताफळाला फटका; उत्पादनात ५० टक्क्यांची घट

SCROLL FOR NEXT