किसान आधार संमेलनाचे उदघाटन करताना मान्यवर
किसान आधार संमेलनाचे उदघाटन करताना मान्यवर 
मुख्य बातम्या

शेतीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज ः डॉ. अशोक दलवाई

टीम अॅग्रोवन

नगर  : देशातील अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीशिवाय आपला सार्वत्रिक विकास शक्य नाही.  उद्याच्या भविष्यासाठी शेतीकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. शेतीमधील नैसर्गीक ऊर्जास्रोताचे पुनरुज्जीवन करून शेती भविष्यात चांगल्या स्थितीत राहू शकेल. पर्यायाने मानवाचे जीवनमान उंचावेल, असे मत राष्ट्रीय कोरडवाहू क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई यांनी व्यक्त केले.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात शुक्रवारी (ता. २५) किसान आधार संमेलनाचे डॉ. दलवाई यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा होते. या वेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक विश्वजित माने, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगरू डॉ. रविप्रकाश दाणी, उझबेकिस्तान येथील नमणगन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेचे डॉ. रावश्यान इस्मायलो, कामधेनू विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य प्रतापराव भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. शिवाजी जगताप, अधिष्ठाता (कृषी) डॉ. अशोक फरांदे, कुलसचिव  सोपान कासार, नियंत्रक  विजय कोते, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके कृषी उपसंचालक विलास नलगे आदी उपस्थित होते. 

डॉ. दलवाई म्हणाले, की आज जगाला जागतिक तापमानवाढीची समस्या भेडसावत आहे. माती व जमिनीतील पाण्याची प्रत खराब झाल्यामुळे  शेती धोक्यात आली असून, मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी शेतीतील जैविक घटकांचे अवशेष पुन्हा मातीत मिसळवणे गरजेचे आहे. निसर्गाने दिलेल्या स्रोतांचा जास्तीत जास्त वापर करून ऊर्जेची गरज भागवली पाहिजे. गेल्या चार वर्षांत केंद्र सरकार शेती क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करून कृषी विस्ताराचे धोरण आखत आहे. पीक उत्पादन घेताना उत्पादन खर्च कमी करणे गरजेचे आहे. 

या वेळी शिवाजीराव जगताप यांनी कृषी विभागाचा आढावा सादर केला. मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधन कार्यावर बनविलेल्या चित्रफितीचे तसेच पशुप्रदर्शन आणि कृषी प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी प्रास्ताविक डॉ. शदर गडाख यांनी केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT