sowing
sowing  
मुख्य बातम्या

राज्यात खरिपाची ६५ टक्के पेरणी

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात २२ जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला असून, खरिपाच्या पेरण्या आता ६५ टक्क्यांच्यापुढे सरकल्या आहेत. काही भागात सोयाबीनचा दुबार पेरा होत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.   राज्यात ११ जूनला मॉन्सूनचे आगमन झाले. अर्थात ठाणे, रायगड, पालघर, नंदुरबार, गडचिरोलीत जूनमध्ये ७५ टक्क्यांच्या आतच पाऊस झाला. रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, नांदेड, अकोला, वर्धा, चंद्रपूरमध्ये मात्र ७५ ते १०० टक्क्यांपर्यंत पाऊस आहे. राज्याच्या उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये मात्र १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. कृषी विभागाच्या २९ जूनच्या अहवालानुसार, ३५५ तालुक्यांपैकी १२ तालुके असे होते, की तेथे केवळ २५ ते ५० टक्के पाऊस होता. ५२ तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला होता. तथापि, गेल्या आठवड्यातील पावसामुळे काही तालुक्यांचे चित्र बदलले आहे.   राज्यात यंदा १४१ लाखांपेक्षा जास्त शेतजमीन खरिपाच्या पेऱ्यासाठी गृहीत धरण्यात आली आहे. त्यापैकी जूनअखेर ९० लाख हेक्टरवर पेरा झाला. चांगल्या पावसामुळे राज्याच्या विविध भागांत नागली व भात रोपवाटिकांची कामे प्रगतिपथावर आहेत. रोपवाटिका सध्यातरी चांगल्या स्थितीत आहेत. धूळपेरा झालेला धान; तसेच अर्ली म्हणजे लवकर पेरा केलेल्या भागातील सोयाबीनदेखील वाढीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी भात, नागलीच्या पुनर्लागवडीला वेग आला आहे, असे कृषी विभागाने म्हटले आहे.

सोयाबीन २९ लाख हेक्टरवर राज्यात कडधान्याचा ५४ टक्के पेरा झाला आहे. यात तुरीचा ४० टक्के; तर मूग, उडदाचा ५० टक्के पेरा झाला. ४१.७८ लाख हेक्टरपैकी ३३ लाख हेक्टरवर (७९ टक्के) कपाशीचा पेरा आटोपला आहे. सोयाबीनचा पेरा २९ लाख हेक्टरवर झाला असून तो राज्याच्या एकूण सोयाबीन क्षेत्राच्या ७५ टक्के आहे. प्रतिक्रिया... मराठवाड्यात चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे ७५ टक्के पेरा आटोपला आहे. केवळ सोयाबीनमध्ये दुबार पेऱ्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचा दिसतो आहे. दर्जेदार बियाण्यांची खात्री असल्यास सोयाबीनचा पेरा १५ जुलैपर्यंत करता येईल. याशिवाय तूर व तूर आधारित आंतरपिकांसाठी आठवडाभर संधी आहे. – डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT