Kharif seeds start selling in Aurangabad
Kharif seeds start selling in Aurangabad 
मुख्य बातम्या

औरंगाबादमध्ये खरिपातील बियाणे विक्री सुरू

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे खरीप हंगामासाठीचे बियाणे विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, पैठण रोड, शेतकी शाळा परिसर येथे उपलब्ध आहे. त्यांची विक्री शुक्रवारी (ता. २९) सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी या बियाणे विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळाला. 

यात बियाण्यांत तूर बिडीएन ७११ तीस क्विंटल प्रति ६ किलो या प्रमाणे ५०० बॅग उपलब्ध झाल्या आहेत. त्या सोबत मूग बिडीन २००३ ०२ या ८५ बॅग प्रति ६ किलो, त्यानंतर खरीप सुधारित ज्वारी परभणी शक्ती १२५ प्रति बॅग ४ किलोप्रमाणे विक्रीसाठी आहे, अशी माहिती विभागीय कृषी विस्तार केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांनी दिली. 

बियाण्यांची आगाऊ नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक काळजी घेत बियाणे खरेदी करण्यासाठी औरंगाबाद येथे पैठण रोड वरील विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्रात येता येईल. २९ मेपासून बियाणे विक्री सुरू आहे. शेतकऱ्यांनी सर्वात मिळून वाहनाची सोय करत एक व्यक्तीस कार्यालयात पाठवले तरी नोंदणी केल्याप्रमाणे बियाणे मिळेल. त्यामुळे सध्याच्या संकटात सर्वांनी स्वतः ची काळजी घेत आणि नियमाचे पालन करत बियाणे खरेदी करावे, असे ठोबरे यांनी कळविले. 

गत खरीप हंगामात ६४ क्विंटल तुरीचे बीडीएन ७११ बियाणे, तर ८२५ बॅग तूर, ज्वारी, सोयाबीन व मूग बियाण्यांची विक्री औरंगाबाद येथील विभागीय कृषी व शिक्षण विस्तार केंद्रातून करण्यात आली. रब्बी २०१९ मध्ये हरभरा, ज्वारी व करडईच्या ३३० बॅग बियाण्यांची विक्री करण्यात आली. जवळपास ५१६ गावातील ७५९ शेतकऱ्यांनी दोन्ही हंगामातील कृषी विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेले बियाणे खरेदी केले होते, असे ठोंबरे म्हणाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT