For kharif in Jalgaon district supply of chemical fertilizers
For kharif in Jalgaon district supply of chemical fertilizers 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः जिल्ह्यात नव्या म्हणजेच २०२०-२१ च्या खरिपासाठी रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत आहे. पुरवठादार कंपन्यांची गोदामे व इतर भागात साठवणूक बऱ्यापैकी झाली आहे. नव्या हंगामात अडचण येणार नाही, असा दावा कृषी विभागातील सूत्रांनी केला. 

जिल्ह्यात खरिपासाठी तीन लाख २० हजार मेट्रिक विविध रासायनिक खतांचा कंपन्यांतर्फे पुरवठा होणार आहे. यातील ९५ ते ९८ टक्के खतांचा पुरवठा रेल्वे रॅकच्या माध्यमातून होईल. रेल्वेची मालवाहतूक व्यवस्था सुरू असल्याने हा खतपुरवठा बऱ्यापैकी झाला आहे. मागील महिन्याच्या सुरवातीलाच युरियाचे दोन रॅक दाखल झाले.

याद्वारे सुमारे १२ हजार मेट्रिक टनांपेक्षा अधिक युरिया दाखल झाला आहे. तर, संयुक्त खतांचे रॅकही दाखल झाले असून, पुढील आठवड्यात हा पुरवठा आणखी गतीने होणार आहे. युरियाची अधिकची गरज जिल्ह्यात असते. यामुळे युरियाचा पुरवठा पुरेसा करून घेण्यासंबंधी संबंधित पुरवठादारांना सूचना दिल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात सोमवारपर्यंत (ता.४) नव्या हंगामासंबंधी सुपर फॉस्फेट, पोटॅश, डीएपीचा मिळून २८ हजार मेट्रिक टनांवर पुरवठा झाल्याचे सांगण्यात आले.  जिल्ह्यास मंजूर खतपुरवठा (पुरवठा मेट्रिक टनांमध्ये)  

युरिया १११७२०
सुपर फॉस्फेट ६२७३०
पोटॅश ६००००
डीएपी १२६९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT