in Khandesh Half of banana cultivation
in Khandesh Half of banana cultivation 
मुख्य बातम्या

खानदेशात कांदेबाग केळीची लागवड निम्मीच

टीम अॅग्रोवन

जळगाव ः  खानदेशात कांदेबाग केळी लागवडीला मध्यंतरी वेग नव्हता. यामुळे लागवड अपेक्षेच्या तुलनेत निम्मीच झाली आहे. यंदा सुमारे १३ ते १४ हजार हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे. 

ऑक्टोबरमध्ये लागवड पूर्ण होते. पण, यंदा लागवड पूर्ण झालेली नाही. मध्यंतरी पावसामुळे ही लागवड रखडली. कारण, लागवडीसाठी वाफसा हवा असतो. कांदेबाग केळीसाठी अधिकाधिक शेतकरी कंदांचा उपयोग करतात. अपवादानेच रोपांचा उपयोग या लागवडीसाठी खाानदेशात केला जातो. कंद जुनारी किंवा कापणी पूर्ण झालेल्या केळी बागांमधून काढून त्यांची लागवड करावी लागते. पण, पावसामुळे कंद काढणे, वाहतूक आदी कार्यवाही बंद होती. पण वातावरण कोरडे होताच या कामाला वेग आला आहे. 

कांदेबाग केळीची लागवड निम्मीच झाली आहे. ही लागवड या आठवड्यात वेग घेईल. कांदेबाग केळीची लागवड जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, पाचोरा-भडगाव, जामनेर, काही प्रमाणात यावलमध्ये आणि धुळ्यातील शिरपूर तालुक्यात केली जाते.

एकट्या जळगाव जिल्ह्यात साडेआठ ते नऊ हजार हेक्टरवर कांदेबाग केळी लागवड अपेक्षित आहे. हलक्या, काळ्या कसदार जमिनीत लागवड केली जाते. पूर्वमशागतही अनेक भागात ठप्प झाली होती. पूर्वमशागत पूर्ण करून लागलीच लागवड केली जाते. यंदा लागवड काहीशी लांबणार आहे. 

मजूरटंचाईचा प्रश्‍न

यंदा नोव्हेंबरमध्येही लागवड सुरू राहील. लागवडीसाठी कंदांची निवड सर्व तोटे, फायदे लक्षात घेवून शेतकरी करीत आहेत. चोपडा, जळगाव भागातील शेतकरी रावेर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, औरंगाबादमधील कन्नड, सोयगाव भागातून कंद आणत आहेत. वाहतुकीसह प्रतिकंद पाच रुपये दर पडत आहे. यंदा वाहतूक खर्च व कंद काढण्याची मजुरी अधिक लागत आहे. मजूरटंचाईदेखील आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT