अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’ खर्च करणार ‘केम’चा निधी
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’ खर्च करणार ‘केम’चा निधी 
मुख्य बातम्या

अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’ खर्च करणार ‘केम’चा निधी

टीम अॅग्रोवन

अकोला  ः कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्पा (केम)चा निधी शिल्लक असल्याने तो खर्च करण्यासाठी अकोला जिल्ह्यात आत्मा यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात निर्देश देत योजनानिहाय नियोजन करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे.

कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्पाला ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र या प्रकल्पाच्या योजना राबवण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. मार्च २०१७ पासून या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. प्रकल्प अंतिम टप्यात पोचला असून प्रत्येक जिल्ह्यात कोट्यवधींचा निधी अखर्चित आहे.

विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी यांच्याकडून आर्थिक मदतीतून हा प्रलल्प राबवण्यात आला. या प्रकल्पामध्ये शासकीय संस्था, सेवाभावी संस्था तसेच खाजगी कंपन्याच्या माध्यमातून काम करण्यात आले.

घटलेले कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबवीत शेती व इतर उत्पन्नाच्या साधनांद्वारे शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करणे, सेंद्रिय शेती व किमान निविष्ठांची कंत्राटी शेती पद्धती अवलंबून कृषी विकास करणे, कृषी उत्पादनांची प्राथमिक प्रक्रिया, त्यांची गुणवत्तावाढ, मालाची विक्री याची सुविधा तयार करणे व इतर उपाययोजनांसाठी हा प्रकल्प राबवण्यात आला. यात बरीच कामे झाली. काही योजनांची अंमलबजावणी वादग्रस्तही ठरली.

आता हा प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आहे. यात विविध योजनांसाठीचा कोट्यवधीचा निधी शिल्लक असून तो खर्च करण्यासाठी आत्मा यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. या अनुषगाने वरिष्ठ स्तरावर चर्चा विनिमय होऊन नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अकोल्यात उभा राहणार ॲग्रोमॉल? अकोला जिल्ह्यात निर्यातक्षम केळी, भाजीपाला उत्पादित करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनात आजवर विविध बैठका झाल्या. याचे चांगले परिणाम पुढे येऊ लागले असून, निर्यातक्षम केळी पिकवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. काही केळी निर्यातसुद्धा झाली. आता निर्यातक्षम भाजीपाला उत्पादित करण्यासाठी काम सुरू झाले आहे. आगामी काळात मिरची, भेंडी व इतर भाजीपाला निर्यात केला जाणार आहे. अकोल्यात ॲग्रोमॉल उभारला जाऊ शकतो का, याबाबत चाचपणी केली जात आहे. आत्मा, केम, कृषी स्पर्धाक्षम प्रकल्प आदींच्या अधिकाऱ्यांना या दृष्टीने आढावा घेण्याबाबत सांगण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT