`karpa` on onion crop in some parts of Karjat taluka
`karpa` on onion crop in some parts of Karjat taluka 
मुख्य बातम्या

कर्जत तालुक्यात काही भागांत कांदा पिकावर करप्याचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन

नगर : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील काही भागांत कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच कमी पाऊस असलेल्या भागात कांदा पिकात हुमणीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. याचा परिणाम पीकवाढीवर झाला आहे. 

जिल्ह्यात रब्बी कांद्याची लागवड सुरू झाली आहे. लेट खरीपातही बऱ्यापैकी कांद्याची लागवड झाली आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाचा कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे लेट खरिपातील तसेच रब्बीच्या सुरवातीला लागवड झालेल्या कांद्याचे नुकसान झाले. सध्या बाजारात कांद्याचे पुरेशी आवक होत नसल्याने दरही वाढलेले आहेत.

कर्जत तालुक्यातील निंभे, अहिल्यानगर, शेगुड आदी भागात यंदा फारसा पाऊस झालेला नाही. सध्या सततच्या बदलत्या हवामानामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले आहे.

शेतकऱ्यांनी नियंत्रणासाठी बुरशीनाशकांची फवारणी सुरू केली आहे. याचबरोबरीने यंदा हुमणीचा प्रादुर्भाव दिसत आहे. कृषी विभागाने याची दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी विजय कोपनर यांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका

Weather Update : विदर्भात गारपीट, वादळी पावसाचा इशारा

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

SCROLL FOR NEXT