jyotiba khete
jyotiba khete 
मुख्य बातम्या

जोतिबाच्या खेट्यास प्रारंभ, हजारो भाविक दाखल

टीम अॅग्रोवन

जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर: जोतिबाच्या खेट्यास रविवार(ता. १६)पासून प्रारंभ झाला. यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांतून दीड लाखावर भाविक दर्शनासाठी आले. रविवारी सकाळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी अभिषेक, सालंकृत महापूजा तसेच धुपारती सोहळा झाला.   जोतिबाच्या खेट्यांना पहाटे चार वाजल्यापासून पारंभ झाला. कुशिरे, पोहाळे गिरोली, दाणेवाडी या भागातील डोंगराकडे येणारे पायी रस्ते गर्दीने फुलून गेले. त्यांना जत्रेचे स्वरूप येते. पहाटेच्या प्रहरी हा डोंगर परिसर चांगभलंच्या गजराने जयघोषाने दुमदुमून गेला. कोल्हापुरातील भाविक पंचगंगा नदीपासून अनवाणी पायी चालत आले, तर पंढरपूर, बार्शी, बेळगाव, सांगली, सातारा या भागातील भाविक गायमुख तलाव मार्गे पायी आले.  माघ महिन्यातील पाच रविवारी जोतिबा डोंगरावर भरणाऱ्या यात्रेस जोतिबाचे खेटे असे म्हणतात. या रविवारी भाविक शक्यतो अनवाणी पायाने चालत येतात. यामध्ये महिला, वयोवृद्ध, चिमुकले, तरुण वर्गातील भाविकांची संख्या लक्षणीय असते. गर्दीमुळे संपूर्ण ज्योतिबा डोंगर गर्दीने फुलून जातो. या वेळी चांगभलंचा अखंड जयघोष होतो. कोल्हापुरातील भाविक तर पंचगंगा नदी ते कुशिरे गायमुख तलाव मार्ग ज्योतिबा वर येतात. सांगली, सातारा, बेळगाव, पुणे मुंबई या भागातील भाविक गायमुख तलाव, पायरी रस्ता, दक्षिण दरवाजा मार्ग अनवाणी पायाने चालत जोतिबावर येतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT