संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात ज्वारीच्या उत्पादकतेने दुष्काळ केला अधोरेखित 

टीम अॅग्रोवन

नगर   ः दुष्काळाच्या तीव्रतेचा यंदा सर्वाधिक फटका ज्वारी उत्पादनाला बसला आहे. यंदा जिरायती भागात तर केवळ हेक्टरी एक क्विंटल चाळीस किलो ज्वारी निघाली आहे. जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत यंदा उत्पादकतेत कमालीची घट झाली आहे. बागायती भागात हेक्टरी तीन क्विंटल ४८ किलो ज्वारी निघाली आहे. त्यामुळे सधन, बागायती अशी सर्वदूर ओळख असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये जिरायती भागात यंदा दुष्काळीची तीव्रता किती आहे याची प्रचिती येत आहे. 

सधन, उसाचा आणि कारखानदाराचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्याच्या जवळपास सर्वच भागात यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. उत्तरेतील राहुरी, राहाता, श्रीरामपूर, नेवासा तर दक्षिणेतील श्रीगोंदा भागात उसाचे क्षेत्र अधिक आहे. मात्र अन्य भागात उसाशिवाय रब्बीत ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. रब्बीत सरासरी साडेचार ते साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची लागवड केली जाते. यंदा पुरेसा पाऊस नसल्याचा गंभीर परिणाम रब्बी हंगामावर झाला आहे. त्यामुळे सरासरीच्या साठ टक्के क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली खरी, परंतु परतीचा पाऊस आला नाही. पावसाळ्यातही पाणी उपलब्ध न झाल्याने पेरलेल्या ज्वारीत दाणेच भरले नाहीत. त्याचा थेट परिणाम उत्पादकतेवर झाला आहे. 

जिल्ह्यामधील संगमनेर, कर्जत, जामखेड, पारनेर, कर्जत, पाथर्डी, शेवगाव भागात रब्बीत ज्वारी हे प्रमुख पीक आहे. मात्र यंदा दुष्काळामुळे गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत निचांकी उत्पादन निघाले आहे. विशेषतः जिरायती भागाला उत्पादकता घटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. हे कृषी विभागाने केलेल्या पीक कापणी प्रयोगातून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याच्या सरासरीचा विचार करता जिरायती भागात ज्वारीची एकरी ५६ किलो उत्पादकता मिळाली असून त्याची सध्याच्या बाजारभावानुसार दीड हजार रुपये किंमत होतेय. बागायती भागात ३४८ किलो ज्वारी निघाली आहे. 

बाजारात आवक नाही नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मार्च ते जून या कालावधीत मोठ्या प्रमाणात ज्वारीची आवक होत असते. ज्वारीचे बंपर उत्पादन निघत असलेल्या नगरसह शेजारच्या सोलापूर, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद व पुणे जिल्ह्यामधील काही भागात यंदा मात्र ज्वारीचे उत्पादन फारसे निघाले नाही. त्याचा बाजारातील आवकेवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पन्नास टक्केही आवक होत नाही. 

 अशी आहे ज्वारीची उत्पादकता  (किलोमध्ये) 
वर्ष   बागायती जिरायती
२०१३-१४  ९८५ ५३२
२०१४-१५ ८६६ ४३१
२०१५-१६ ५११ २०५
२०१६-१७ ९३३  ४३१
२०१७-१८ ८०६ ४०३
२०१८-१९ ३४८ १४०
यंदाचे तालुकानिहाय उत्पादन (किलोमध्ये)
तालुका बागायती जिरायती
नगर  १६०  १२२
पारनेर २१४ ०.४१७
श्रीगोंदा  ६५१ १२७
कर्जत ३३५ ७२
जामखेड  ५०६ ५४९
शेवगाव १९७  १५७
पाथर्डी  ४५४ ३५
नेवासा २०३ ५१९
राहुरी १२५
संगमनेर ४९१ १५२
अकोले  ०   ०
कोपरगाव  ५०९ २८३
श्रीरामपूर
राहाता  ११३८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT